Balasaheb Thorath News : भाजपचा सुपडा साफ होणार, इंडिया आघाडीचं सरकार येणार; थोरातांचं कॉन्फिडन्स जोरात...

Lok Sabha Election 2024 : "शेतकरी आणि नागरिक कांदा प्रश्नावर बोला, अशी विनंती करतात. त्याला पंतप्रधान जय श्रीराम अशी घोषणा देऊन वेळ मारून नेतात. हा भाजपचा फसलेला प्रचार आहे."
Balasaheb Thorath News
Balasaheb Thorath NewsSarkarnama

Nashik Latest News : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आता संपला आहे. या कालावधीत भारतीय जनता पक्षाने शेतकरी आणि जनतेला खोटे स्वप्न दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेला ते पूर्णतः कळून चुकले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काल धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारासाठी मालेगाव येथे दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांचा मेळावा देखील घेतला. या मेळाव्यात काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आणि त्यातील जनहिताचे व समाजाला पुढे नेण्याच्या तरतुदींची सविस्तर माहिती दिली. काँग्रेसचे सरकार प्रत्येक युवकाला एक लाख रुपयाच्या नोकरीची गॅरंटी देते, असे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, "धुळ्याच्या स्थानिक खासदाराला आपले मंत्रिपद देखील टिकवता आले नाही. गेल्या दहा वर्षात त्यांचा मतदारसंघात काहीही संपर्क नव्हता. मतदार पुढे येऊन त्यांच्या बाबत अनेक तक्रारी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला यंदा निश्चित बसेल, असा आमचा विश्वास आहे."

Balasaheb Thorath News
Vikhe and Thorat : विखे पिता-पुत्र खरगेंना भेटल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा! ; थोरात म्हणतात, 'मला विचारल्याशिवाय...'

शेतकरी आणि नागरिक कांदा प्रश्नावर बोला, अशी विनंती करतात. त्याला पंतप्रधान (Narendra Modi) जय श्रीराम अशी घोषणा देऊन वेळ मारून नेतात. हा भाजपचा फसलेला प्रचार आहे. आम्ही देखील श्रीरामाचे पुजारी आहोत. आमच्या मनात राम आहे. मात्र निवडणुकीत प्रचार करताना सरकारने काय केले? जनतेचे प्रश्न काय आहेत? महागाई, बेरोजगारी यावर सरकारने काय काम केला, हे सांगण्याची आवश्यकता असते. मात्र भाजप आणि त्यांचे नेते यावर तोंड उघडत नाही.

Balasaheb Thorath News
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !
Balasaheb Thorath News
BJP Political Analysis : उत्तर महाराष्ट्रातील वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा यंदा प्रखर संघर्ष

भारतीय जनता पक्षाचे खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत तोंड देखील उघडत नाहीत. त्यांचे सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवतात शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने तीन कायदे केले. त्या विरोधात झालेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला दडपण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दहा महिने शेतकरी आंदोलन चालले. त्यात 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्याची जबाबदारी कोणाची आहे? या सरकारला आम्ही ती जबाबदारी घेण्यास भाग पाडू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ काँग्रेस (Congress) पक्ष काम करू शकतो शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकतो. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानात शेतकरी सुज्ञ झालेला दिसेल. ते मतदानातून भाजप आघाडीला नाकारल्याशिवाय राहणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com