Naresh Arora: अजितदादांसह राष्ट्रवादीला 'प्रसिद्धी'च्या शिखरावर पोहोचवणाऱ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द! राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या मीडिया कंपनीचं काम राष्ट्रवादीकडून थांबवण्यात आल आहे.
Ajit Pawar Naresh Arora
Ajit Pawar Naresh Arorasarkarnama
Published on
Updated on

Naresh Arora: विधानसभा निवडणुकीवेळी ही लाडकी बहीण योजनेची कन्सेप्ट, अजितदादांचं गुलाबी जॅकेट अन् रंगसंगती त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीसोबतचा करार आता राष्ट्रवादी काँग्रेसनं रद्द केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षानं हा मोठा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar Naresh Arora
Teacher's Recruitment: शिक्षक भरतीसाठी 'हे' नियम पाळावेच लागतील! खासगी, सरकारी संस्थासाठी राज्य सरकारचा नवा अध्यादेश

राष्ट्रवादीकडून डिझाईन बॉक्स या मीडिया कंपनीचं काम थांबवण्यात आलं आहे. डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी राजकीय सल्लागार म्हणून काम केलं आहे. २०२४च्या विधानसभा निवडणुकीवेळी डिझाईन बॉक्सनं राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोलिटिकल कॅम्पेनचं काम केलं होतं. या कॅम्पेन दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराच्या अनुषंगानं गुलाबी रंगांची रंगसंगती राष्ट्रवादीच्या सर्व प्रचार साहित्यात झळकत होती. खुद्द अजितदादा हे गुलाबी जॅकेटमध्ये दिसू लागले होते.

Ajit Pawar Naresh Arora
Kalpna Kharat: गुन्हा दाखल झाल्यानंतर अशोक खरातची पत्नी फरार! मुलगा ताब्यात; शोधासाठी दोन पथकं रवाना

प्रत्यक्ष निवडणूक प्रचार काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर रुम्स या गुलाबी रंगानं सजलेल्या दिसत होत्या. यामध्ये प्रत्येक पोस्टर, फ्लेक्स हे गुलाबी रंगसंगतीत होते, राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबतच गुलाबी रंगाचे झेंडेही सर्वत्र दिसत होते. त्यानंतर निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं, त्यामुळं गुलाबी रंग हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी एका अर्थानं लकी ठरला होता. हे सर्व गुलाबी कॅम्पेन डिझाईन बॉक्स कंपनीनं अर्थात नरेश अरोरा यांनी केलं होतं.

Ajit Pawar Naresh Arora
Nanded Bank: नांदेड जिल्हा बँकेचे निम्मे संचालक बसणार घरी? सहकार कायद्याच्या नवा नियम येणार आडवा; आता वारसांसाठी धडपड सुरु

दरम्यान, पण आता अजित पवारांच्या निधनानंतर या कंपनीचं काम पक्षाकडून थांबवण्यात आलं आहे. पण अचानक हा निर्णय का घेण्यात आला याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com