Girish Mahajan : राऊत बोलण्याआधीच महाजनांचे काम सुरू; केंद्राच्या संपर्कात असल्याचे सांगत महाराष्ट्राला दिला दिलासा...

Sanjay Raut Criticism : इराण-इस्रायल युद्धावरून गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले असून शेतकऱ्यांवरील परिणामाबाबत सरकार गंभीर असल्याचे सांगितले.
Girish Mahajan responds to Sanjay Raut over Iran-Israel war remarks, assures safe return of stranded Indians.
Girish Mahajan responds to Sanjay Raut over Iran-Israel war remarks, assures safe return of stranded Indians.Sarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News : इराण आणि इस्रायल युद्धाचा भडका आता उडाला आहे. हे युद्ध अधिक ताणले जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आखातात अनेक भारतीय अडकून पडले आहेत. इराण युद्धावर आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. केंद्र शासनाने या प्रश्नावर योग्य भूमिका घेण्याची गरज असल्याचे खासदार राऊत म्हणाले होते.

त्याला भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. खरे तर संजय राऊत यांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. राऊत यांनी केलेले विधान योग्य नाही. कदाचित ते आखातात जाऊन युद्धातही सहभागी होऊ शकतात, असा टोमणा महाजन यांनी लगावला. भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन महाजनांनी दिले असून शेतकऱ्यांवरील परिणामाबाबत सरकार गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या सुरू असलेले युद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना घडामोडींचा भाग आहे. या संदर्भात सगळ्यांनीच संयमाने वागले आणि बोलले पाहिजे. ही स्थिती कोणावर टीका करण्याची नाही. संयमाने परिस्थितीचे अवलोकन करण्याचे आहे, असे ते म्हणाले.

Girish Mahajan responds to Sanjay Raut over Iran-Israel war remarks, assures safe return of stranded Indians.
Nashik Crime : नाशिकमध्ये 'लव्ह जिहाद', पोलिसांनीच गुन्हेगाराला सावध करुन फरार केलं ; भाजप शहराध्यक्षांचा गंभीर आरोप

जग अतिशय वेगाने तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करीत आहे. तसे झाल्यास त्याचा मोठा फटका सबंध जगाला बसणारा. भारतीय पासून अलिप्त आणि सुरक्षित आहे. अशा स्थितीत बालिश विधाने करणे टाळले पाहिजे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा मोठा फटका उत्तर महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष आणि अन्य निर्यातीवर झालेला आहे. नाशिकचे द्राक्ष आणि कांदा आखातातील देशांना आणि दुबईला जातो. त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे.

Girish Mahajan responds to Sanjay Raut over Iran-Israel war remarks, assures safe return of stranded Indians.
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना क्लिन चीट! वादळ उठलेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता; सलग तिसऱ्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर

सध्या कांद्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. सरकारला त्याची जाणीव आहे. यासंदर्भात शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सध्या सुरू असलेल्या आंदोलन आणि त्यांच्या मागण्या राष्ट्र वाटतात. याबाबत लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com