

Nida Khan News : टीसीएसमधील एचआर अधिकारी असलेल्या निदा खान हिच्या जबरदस्तीने धर्मांतरासाठी दबाव, लैगिंक शोषण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. काॅरर्पोरेट जिहादचा हा प्रकार असल्याचा दावा करत निदा खान हिला अटक करण्यात आली आहे. निदा खान हिच्या समर्थनात एमआयएम पक्ष मैदानात उतरला आहे. इम्तियाज जलील, असदुद्दीन ओवेसी यांनी तिच्यावर आरोप झाले, म्हणजे ती दोषी ठरत नाही, उच्चशिक्षित मुस्लिम तरूणांना टारगेट करण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप या दोन नेत्यांनी केला आहे.
या प्रकरणात फरार असलेली निदा खान छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागात नाशिक पोलीसांना सापडली. विशेष म्हणजे एमआयएमच्या नगरसेवकाने तिला आपल्या घरात लपवून ठेवले होते. या प्रकरणी मतीन पटेल याच्यावर गुन्हा दाखल होताच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचा या प्रकरणात हात असल्याचा आरोप केला होता. तसेच निदा खान प्रकरणात इम्तियाज यांची चौकशी करावी, असेही शिरसाट म्हणाले होते.
आता संजय शिरसाट यांनी निदा खान ही इम्तियाज जलील यांच्या भावाच्या बायकोची नातेवाईक असल्याचा दावा केला आहे. 'एबीपी माझा' चॅनलशी बोलताना शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केला आहे. इम्तियाज जलील यांच्या भावाच्या बायकोची ती नातेवाईक असल्याने इम्तियाज यांचा या प्रकरणाशी थेट संबंध येत आहे. एमआयएमच्या नगरसेवकाने निदा खानला नारेगाव भागातील आपले घर राहायला दिले. आपल्या बाॅसने सांगितल्यावर त्याला ते करणे भाग पडले.
निदा खानशी असलेले इम्तियाज यांचे हे नवे कनेक्शन गंभीर आहे. त्यामुळे त्यांना आता अटक झाली पाहिजे, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असल्याचेही शिरसाट यांनी सांगीतले. संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यावर इम्तियाज यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. निदा खान प्रकरणावरून एमआयएम आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.
शिरसाट यांच्या आरोपांवर इम्तियाज जलील यांनी मी त्यांना कवडीची किमंत देत नाही, असे म्हणत आरोप फेटाळले होते. पोलीसांनी माझ्याकडे चौकशी केली तर मी सहकार्य करील, अशी भूमिका इम्तियाज यांनी घेतली होती. शिवाय ओवेसी यांनीही निदा खान हिच्यावर आरोप झाले म्हणजे ती दोषी ठरत नाही, न्यायालयावर आमचा विश्वास असल्याचे सांगीतले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.