

Navnath Ban News : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत महायुतीचा तीन जागांवर पराभव झाला. या पराभवासाठी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जबाबदार धरले आहे.
जर शिंदेंच्या शिवसेनेने साथ दिली असतील तर पदवीधरच्या तीनही जागांवर आम्ही विजय मिळवला असता. मात्र, एका जास्त जागेच्या हव्यासापोटी तीन जागा गमवाव्या लागला, असा टोलाही त्यांनी लगावला.
बन यांनी म्हटले की, 'शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.'
शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही, असे देखील बन यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, महायुती जिंकली असती मात्र मित्रपक्षाच्या हव्यासापोटी, तिसऱ्या जागेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जे निर्णय घेतात त्यांच्यामुळे महायुतीला फटका बसला. सचिन सानप यांना जी 10 ते 12 हजार मतं मिळाली ती पदवीधरला देखील मिळू शकली असती. मात्र, शिवसेनेच्या पाठींब्यामुळे ती मतं फिरली आणि पुणे पदवीधरमध्ये फटका बसला.
शिंदेंच्या शिवसेनेला सोडलेल्या अमरावतीच्या जागेवर भाजपमधून बंडखोरी झाल्यानंतर आम्ही त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत केले. मात्र, त्यांनी पुण्यातील जागेवर अपक्षाला अधिकृत पाठींबा दिला. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. मात्र, यामधूनमहायुतीमधून आत्मचिंतन करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.