Navnath Waghmare : मराठा समाजातील मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे अडचणीत; अखेर गुन्हा दाखल!

OBC Activist Navnath Waghmare FIR : मराठा समाजातील मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Navnath Waghmare FIR
Navnath Waghmare StatementSarkarnama
Published on
Updated on

Maratha Vs OBC: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना मराठा समाजातील मुलींविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार आहे. त्यांच्या विरोधात जालन्यातली कदीम येथे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

तक्रारदार महिला म्हणाली की, 'मराठा समाजासातील मुलींसाठी लज्जास्पद वाटेल असे शब्द त्याने उच्चारले आहेत. तसेच दोन समाजामध्ये तेढ वाढेल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. आमची एकच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे.'

मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी संताप व्यक्त करत म्हणाले 'नवनाथ वाघमारेला महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे, असे म्हटले. ते म्हणाले, त्याच्या तोंडात, जीभेवर शिसे ओतले पाहिजे अन् टकमक टोकावरून ढकलून दिले पाहिजे.'

Navnath Waghmare FIR
Maratha Reservation: मुख्यमंत्रीसाहेब, मराठ्यांवर अन्याय करून वैर घेऊ नका... रोष भनायक अवघड असतो : जरांगे पाटलांचं आवाहन

वाघमारे नेमकं काय म्हणाले?

नवनाथ वाघमारे म्हणाले की, 'मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले आहे की माझी सून मराठा आहे. माझी बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगेसोयरे घुसले असतील. बावनकुळेसाहेबांच्या एकट्याच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांची गोंडस मुलं, सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली त्यांच्या घरात घुसतात.

मराठ्यांच्या मुलींचं ऐकूण हे मंत्री ओबीसींचे वाटोळं करत असतील तर त्यांनी समोर येऊन सांगावं, आम्हाला ओबीसींशी देणेघेणं नाही. आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसींशी काही देणेघेणं नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या, आता आम्ही मराठा झालोत, आमचे सगेसोयरे मराठा झाले आहेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, बायका मराठा आहेत.आमच्यानी होणार नाही.'

Navnath Waghmare FIR
Hasan Mushrif : हसन मुश्रीफ शरद पवारांच्या भेटीला; इथेनॉलच्या मुद्द्यावर राहुल गांधींना समज देण्याची करणार विनंती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com