पुणे : 'पैहचान कोन' असं टि्वट करुन फोटो शेअर करणारे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिकांना आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सकाळीच टि्वट करीत 'पैहचान कोन' असे म्हणत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी शुक्रवारी एक फोटो शेअर करत नितेश राणेंची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली होती. त्याला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता त्याला 'पैहचान कौन ? असे म्हटले होतं.
या फोटोमध्ये शरीर कोंबडीचे असून चेहरा मात्र मांजरीचा वापरण्यात आला होता. नवाब मलिकांच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या अनेक उलट-सुलट चर्चा रंगल्या होत्या. आता राणेंनी टि्वट करुन मलिकांना छेडले असल्याचे बोलले जाते.
नितेश राणेंनी देखील आपल्या ट्विटरवरुन आगळावेगळा फोटो शेअर केला आहे. तसेच त्या फोटोला कॅप्शन दिले आहे की,’ही प्रजाती फक्त भंगारात आढळते…ओळखा पाहू कोण?’, असे त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील राणीच्या बागेवरून शिवसेनेला हिणवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिवसेनेचे नेते, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गुरुवारी सकाळीच समोरासोमर आले होते, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या नितेश यांनी आदित्य पायऱ्यांजवळ येताच 'मॅव... मॅव...' करीत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना डिवचलं. 'आधी वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना आता 'मॅव...मॅव...पुरतीच उरल्याचा टोला नितेश राणे यांनी हाणला. त्यावरुन अधिवेशनात चर्चा झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंचे याप्रकरणावरुन कान टोचले होते.
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या 'म्याव...म्याव'वर भाजप आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. गुरुवारी झालेल्या हा प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने त्यांच्या भाषेत सुनावलं आहे. मुंबईच्या महापैार किशोरी पेडणेकर यांनीह नितेश राणेंचा समाचार घेतला.
''आदित्य ठाकरे किंवा इतर कोणाही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यावरुनच सुसंस्कृत आणि असंस्कृतपणा तिथे स्पष्ट दिसला. शिवसेनेचे वाघ असंच म्हंटल जात. त्यामुळे आदित्या ठाकरेंना पाहून भीती वाटली असेल म्हणून पटकन एक अवस्था म्याव म्याव झाली असेल तर माहिती नाही,'' अशी प्रतिक्रिया देत किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणेंना सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.