पहिल्या लग्नाबाबत वानखेडे करणार लवकरच खुलासा..

'जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. याला कायदेशीर उत्तर देणार,' असे वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सांगितल्याचे समजते.
Sameer Wankhede
Sameer Wankhedesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी आज दोन टि्वट करीत वानखेडें यांच्याबाबत महत्वाचे पुरावे आपल्या टि्वट हॅडलवरुन टि्वट केले आहेत. या फोटोबाबत वानखेडे (Sameer Wankhede) लवकरच खुलासा करणार असल्याचे समजते.

मूळ गावी जाऊन कागदपत्रे तपासा, 'खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात आहेत, या प्रकाराला चॅलेंज करणार आहेत, जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. हा खोडसाळ प्रकार सुरू आहेत. याला कायदेशीर उत्तर देणार,' असे वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सांगितल्याचे समजते. मलिकांनी (Nawab Malik) टि्वट केलेल्या फोटोच्या सत्येतेबाबत अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

नवाब मलिक यांनी आपल्या टि्वटर हॅडलवरुन समीर वानखेडेंचा एक जुना फोटो टि्वट केला आहे, या फोटोमध्ये एक महिला व अन्य जण दिसत आहे. वानखेडे यांच्यासोबत असलेली महिला ही डॅा. शबाना कुरेशी असल्याची चर्चा आहे. शबाना यांच्यासोबत समीर वानखेडे याचं पहिलं लग्न झालं असल्याचे समजते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत आणखी एक बाब समोर आणली आहे. मलिक यांनी वानखेडे यांचा जन्माचा दाखल ट्विट केला आहे. यात वानखेडेंचे नाव 'समीर दाऊद वानखेडे' असल्याचे दिसते. या जन्मदाखला मलिका यांनी टि्वट करीत 'इथून सुरू झाला बोगसपणा (फर्जीवाडा)' असे म्हटलं आहे. वानखडे याच्या पहिल्या लग्नाचा फोटो नवाब मलिक यांनी शेअर करत 'पेहचान कोन ?' असे ट्विट केले आहे.

या प्रकरणातील पंच किरण गोसावीच्या बॉडीगार्डने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर वानखेडे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहित पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. रविवारच्या घडामोडींतर वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरनं सोमवारी सकाळी सूचक ट्विट केलं.

किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. आर्यनला एनसीबीने पकडल्यानंतर त्याच रात्री गोसावी व सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले होते. त्यावेळी त्यांच्या पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर सकाळी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा खुलासा बॉडीगार्ड साईलने रविवारी सकाळी केला होता. त्यानंतर एनसीबीने पत्रक काढून हा दावा खोटा असल्याचा म्हटलं.

वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

Sameer Wankhede
मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचलं, म्हणाले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com