Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटील, रोहित पवार लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात..? 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Mahayuti And NCP News: शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं होतं. दोन्ही राष्ट्रवादीनं भविष्यात एकत्र यायचं की नाही, हे नव्या पिढीतील नेतृत्वानं ठरवावं. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
Jayant Patil Rohit Pawar And Devendra Fadnavis .jpg
Jayant Patil Rohit Pawar And Devendra Fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : विधानसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे अनेक नेत्यांचा ओढा वाढला आहे. यात शरद पवारांच्या पक्षातील काही नेतेमंडळीही रांगेत असल्याची चर्चा आहे. अशातच खुद्द पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना हवा देताना हा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यावयाचा असल्याचं सांगितलं. आता याचदरम्यान, ओबीसी नेते व आंदोलक लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) सर्वात मोठा खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.

ओबीसी समाजाचे नेते व आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सोमवारी(ता.19)पंढरपुरात माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीविषयी मोठं विधान केलं. ते म्हणाले,दोन राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या चर्चा जरी आज सुरू असल्या तरी ते कायम एकच होते. येत्या काळात केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात जयंत पाटील व रोहित पवार हे मंत्री झालेले दिसतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, रोहित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यास फडणवीस जरी उत्सुक नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि थेट शरद पवारांचाच हा निर्णय असल्यानं फडणवीसही यात काहीच करू शकत नसल्याची खोचक टिप्पणीही हाके यांनी यावेळी केली.

पण वरिष्ठ पातळीवरील या निर्णयाचा थेट फटका छगन भुजबळ,गोपीचंद पडळकर अशा राज्यातील ओबीसी नेत्यांना बसणार आहे. तसेच भाजपने फक्त मते मिळविण्यासाठी ओबीसी नेत्यांचा वापर केल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला. याचदरम्यान,त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येत असल्याच्या चर्चा जरी आज सुरू असल्या तरी त्या कायम एकच होत्या असा दावाही केला.

Jayant Patil Rohit Pawar And Devendra Fadnavis .jpg
Uddhav Thackeray: '...तर संकटात सापडलेल्या ठाकरेंना पुन्हा सोन्याचे दिवस येणार!'; कट्टर भुजबळ समर्थक नेत्याचं मोठं विधान

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवार हे कितीही फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेत असले तरी ते शाह आणि मोदी यांचे कार्यकर्तेच आहेत, त्यांनी कोणता आव आणण्याच्या भानगडीत पडू नये,अशी जळजळीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

लक्ष्मण हाके यांनी यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले,गेल्या 10 वर्षांत दोन्ही पवार अमित शहांच्या दारात किती वेळा जातात,हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते विमानाने जातात की अजून कशाने, कुठे भेटतात, हेही महाराष्ट्र जाणतो आहे. संजय राऊत यांनी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचेही हाके यांनी म्हटले.

Jayant Patil Rohit Pawar And Devendra Fadnavis .jpg
Gokul News: 'गोकुळ'बाबत सर्वात मोठी अपडेट! मुश्रीफांनी डोळे वटारताच अध्यक्ष अरुण डोंगळे नरमले? दोन दिवसांत राजीनामा...

लक्ष्मण हाके यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला भवितव्य नसल्याची टीकाही हाके यांनी केली. ते म्हणाले,ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन घेतल्यास दूर गेलेला ओबीसी समाजही पुन्हा त्यांच्याकडे परतण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं होतं. दोन्ही राष्ट्रवादीनं भविष्यात एकत्र यायचं की नाही, हे नव्या पिढीतील नेतृत्वानं ठरवावं.  मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे. पण आमची मंडळी विविध पक्षांत विभागली असली तरी विचारानं एकत्र आहेत. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांधले गेल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

तसेच राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकासकामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही, त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा. संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही? हा निर्णय सुप्रियानं घ्यावा. पक्षात दोन प्रवाह आहेत, एकाला वाटते अजितसोबत जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com