
Pandharpur News : शिवसेनेतील आजवरचं सर्वात मोठं बंड, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हही गमावण्याची नामुष्की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे बॅकफूटला गेले. पण याच उद्धव ठाकरेंना आता एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संकटात असताना सोडलेली साथ यामुळे पुढची यापक्षाची वाटचाल खडतर असणार आहे.याचवेळी एका ओबीसी नेत्यानं उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) मोठं विधान केलं आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सोमवारी(ता.19)पंढरपुरात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी जर शरद पवारांची साथ सोडून पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन पकडल्यास त्यांना सोन्याचे दिवस येतील, असं मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलं आहे.
हाके म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील पक्षाची लाईनच सोडल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या गळ्यातील ताईत होता. मात्र, संजय राऊत यांनी शिवसेनेला शरद पवार यांच्या दावणीला नेऊन बांधल्याने वर्षानुवर्षे सोबत असलेला ओबीसी समाज शिवसेनेपासून दूर गेल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
तसेच एकेकाळी 75 आमदार निवडून आणणाऱ्या शिवसेनेवर आज किती वाईट वेळ आली, हे समोर दिसून येत आहे. त्यांनी जर शरद पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा शिवसेनेची मूळ लाईन पकडल्यास त्यांना परत एकदा सोन्याचे दिवस येतील,असं भाकीतही हाकेंनी वर्तवलं आहे.तसे झाल्यास शिवसेना पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असंही ते म्हणाले.
ओबीसी आंदोलक व नेते लक्ष्मण हाके यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला भवितव्य नसल्याची टीकाही हाके यांनी केली.ते म्हणाले,ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन घेतल्यास दूर गेलेला ओबीसी समाजही पुन्हा त्यांच्याकडे परतण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा शब्द म्हणजे देशात भूकंप असायचा. त्यांनी कधीही जात-पात विचारली नाही आणि सर्वसामान्य बहुजनांना ताकद देण्याचे काम केले. त्याचमुळे राज्यातील अठरापगड जाती या शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या असंही हाके यांनी पंढरपुरात सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.