Gokul News: 'गोकुळ'बाबत सर्वात मोठी अपडेट! मुश्रीफांनी डोळे वटारताच अध्यक्ष अरुण डोंगळे नरमले? दोन दिवसांत राजीनामा...

Hasan Mushrif On Arun Dongle : डोंगळेसाहेब, तुम्ही आमचे फोन उचलत नाही. गोकुळचा मी नेता आहे. माझा फोन तुम्ही उचलला नाही. पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात. अशा शब्दात मुश्रीफ यांनी डोंगळे यांना सुनावले. त्यानंतर मंत्री मुश्रीफ आणि डोंगळे हे चंदगड शासकीय विश्रामगृह येथे गेले.
Gokul Dairy’s internal leadership dispute
Gokul Dairy’s internal leadership disputeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून झालेल्या गोंधळानंतर अखेर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष अरुण डोंगळे यांना डोळे वटारले. चंदगड येथील एका कार्यक्रमात मुश्रीफ आणि गोकुळचे (Gokul) अध्यक्ष अरुण डोंगळे यांची भेट होऊन चर्चा झाली. यावेळी "लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात",असे म्हणताच अध्यक्ष अरुण डोंगळे हे राजीनाम्यासाठी तयार झाल्याची माहिती आहे.

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे सोमवारी(ता.19) या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सकाळीच मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मंगळवारी (ता.20) ते सकाळीच भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणार आहेत. त्यानंतरच राजीनामा द्यायचा की नाही या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला जाणार आहे.

अरुण डोंगळे यांच्या गोकुळ दूधसंघावरील अध्यक्षपदाची मुदत येत्या 25 मे रोजी संपणार आहे. तत्पूर्वी 15 मे रोजी डोंगळे यांनी राजीनामा देण्याचा शब्द गोकुळमधील नेत्यांना दिला होता. मात्र, त्याबद्दल बंडखोरी करत अध्यक्ष डोंगळे यांनी मुंबई गाठली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा न देण्याच्या सूचना दिल्यानंतर डोंगळे यांनी राजीनामा देणे टाळले. त्यानंतर राजकीय खळबळ उडाली.

गोकुळमधील नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी वारंवार अध्यक्ष डोंगळे यांना माध्यमांद्वारे राजीनामा द्यावा अशी सूचना केली. तर राजीनामा न देण्याची भूमिका घेतल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी डोंगळे यांना संपर्क केला. मात्र, डोंगळे यांनी तो फोन कॉल स्वीकारला नाही.

Gokul Dairy’s internal leadership dispute
Uddhav Thackeray: '...तर संकटात सापडलेल्या ठाकरेंना पुन्हा सोन्याचे दिवस येणार!'; कट्टर भुजबळ समर्थक नेत्याचं मोठं विधान

दरम्यान आज चंदगड तालुक्यातील गवसे गावचे येथे लग्न सोहळ्यानिमित्त मंत्री मुश्रीफ गेले होते. त्याच लग्नाला गोकुळचे काही संचालक आणि अरुण डोंगळे यांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं. मंत्री मुश्रीफ हे प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्याचवेळी अध्यक्ष डोंगळे तिथे आले.

अध्यक्ष डोंगळे यांना पाहताच, डोंगळेसाहेब तुम्ही आमचे फोन उचलत नाही. गोकुळचा मी नेता आहे. माझा फोन तुम्ही उचलला नाही. पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात. अशा शब्दात मुश्रीफ यांनी डोंगळे यांना सुनावले. त्यानंतर मंत्री मुश्रीफ आणि डोंगळे हे चंदगड शासकीय विश्रामगृह येथे गेले.

Gokul Dairy’s internal leadership dispute
Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'मध्येही फोडाफोडी..! शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या बड्या नेत्यानं सांगितलं, नेमका घोळ कुठे झाला..?

जवळपास अर्धा तास होऊन अधिक त्यांच्या चर्चा झाली. तुम्हाला दिलेला शब्द आम्ही पाळला होता. पण तुम्ही तो शब्द पाळला नाही. न बोलता तुम्ही राजीनामा देणे अपेक्षित होते. असे मुश्रीफ यांनी डोंगळे यांना सांगितलं. त्यावर डोंगळे यांनी देखील आपल्याला समजून घ्यावे. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बोलून राजीनाम्याचा निर्णय घेतो. असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com