Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांसोबतच्या दोन तासांच्या बैठकीनंतर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरणाची चर्चा फक्त....'

Fadnavis statement on NCp merger News : सीएम फडणवीस यांनी शनिवारी सायंकाळी मुंबईत प्रसार माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नाला उत्तरे दिली.
Sunetra Pawar | Devendra Fadnavis
Sunetra Pawar | Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या चार दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शनिवारी सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांची बैठक जवळपास दोन तास पार पडली. या बैठकीनंतर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना मोठे विधान केले आहे. फडणवीस म्हणाले, 'सुनेत्रा पवार या बैठकीस शासकीय कामकाजाच्या निमित्ताने आल्या होत्या. यावेळी कोणत्याही विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नाही. विलिनीकरणाची चर्चा फक्त मीडियामध्येच ऐकायला मिळत आहे. प्रत्यक्षात आम्हाला चर्चा सुरु असल्याचे कोणीही सांगितलेले नाही. आजच्या या चर्चेत विलिनीकरणाबाबत कोणताच विषय नव्हता.'

सीएम फडणवीस यांनी शनिवारी सायंकाळी मुंबईत प्रसार माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नाला उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra pawar) या वर्षा निवासस्थानावरील बैठकीला शासकीय कामकाजाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. आज कोणत्याही विलिनीकरणाची चर्चा नव्हती. मी पुन्हा सांगतो, विलिनीकरणाच्या चर्चा खरेच जर असत्या तर त्यांनी आमच्याशी चर्चा केलीच असती. आम्ही सत्तेत त्यांच्या सोबत आहोत, त्यामुळे मला वाटते की, अद्यापतरी आमच्याशी कोणीही विलिनीकरणासंबंधी चर्चा केलेली नाही. त्यांनी चर्चा सुरु केलेली असती तरी किमान त्यांनी आम्हाला सांगितले तरी असते की आमची अशी चर्चा सुरु आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

विलिनीकरणाबाबतच्या या चर्चा फक्त मीडियामध्ये ऐकायला मिळत आहेत. प्रत्यक्षामध्ये अशा पद्धतीने आम्हाला कोणीही सांगितलेले नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलणे योग्य होणार नाही. आजच्या बैठकीमध्ये तशी कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

Sunetra Pawar | Devendra Fadnavis
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

त्यासोबतच पत्रकारांनी यावेळी डिलिमेटशनबाबत विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तरे दिली. डिलिमिटेशन बिलासाठी शरद पवार यांच्या पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'तुम्ही आज सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद ऐकली असेल तर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, डिलिमिटेशनच्या बिलाला आमची मान्यता आहे. ५० टक्के फ्लॅट सीटा वाढवून मागील वेळेसप्रमाणे डिलिमिटेशनचे बिल आले तर त्या बिलाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थन असेल, असे आज त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मला असे वाटते की, या ज्या वेगवेगळ्या चर्चा आहेत, त्या चर्चा बंद झाल्या पाहिजेत, त्यासोबतच पतंगबाजी देखील बंद झाली पाहिजे.'

Sunetra Pawar | Devendra Fadnavis
NCP Politics : राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या भेटीला; सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीचे खरे कारण समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.