
NCP News : सात वर्षे पक्षासाठी लढताना मी पक्षात कुठे तरी असू असं आमच्या पक्षातील काही नेत्यांना वाटतं आहे. पक्षामध्ये मोठा निर्णय होणार असावा, म्हणून आपला निर्णय मागे ठेवला असावा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पण त्यांच्या या नाराजीतील टीकेचा सूर नेमका कोणाकडे आहे? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (3 फेब्रुवारीपासून) सुरू झाले आहे. पहिल्या दिवसाचे कामकास स्थगित झाल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
काही दिवसांपासून रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करणार असल्याची चर्चा आहे. मात्र विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि अन्य काही ज्येष्ठ नेत्यांचा याला विरोध असल्याचे सांगितले जाते. यातूनच रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष यापूर्वी अनेकदा बघायला मिळाला आहे. आता पुन्हा याच गोष्टीवरून रोहित पवार नाराज आहेत का? असा सवाल आता विचारला जात आहे.
रोहित पवार म्हणाले, "सात वर्षे पक्षासाठी लढताना मी पक्षात कुठे तरी असू असं आमच्या पक्षातील काही नेत्यांना वाटतं आहे. पक्षामध्ये मोठा निर्णय होणार असावा, म्हणून आपला निर्णय मागे ठेवला असावा, पण फक्त आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला काय किंवा नसला काय मी जनतेसाठी लढतच राहिलं," असंही त्यांनी सांगितलं.
नुकतेच रोहित पवार यांनी छावा चित्रपटाचा संदर्भ देत एक ट्विटही केले होते. शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो. पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते, याचाही धडा मिळतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो, असे ट्विट त्यांनी केले होते. त्यापाठोपाठ आज त्यांनी पक्षातीलच काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.