Sanjay Raut : "पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत...; राऊतांनी भाजपला ललकारलं

Sanjay Raut On BJP : "महायुतीकडे सत्ता आहे, प्रचंड लुटलेला काळा पैसा आहे. त्यांच्याकडे पोलिस, ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा यंत्रणा आहेत. त्यामुळे ते आघाडीचे आमदार आणि नेते संपर्कात असल्याचा दावा ते करू शकतात. मात्र, या यंत्रणा आमच्याकडे असत्या, तर अख्खा भाजपा आम्ही पंधरा मिनिटांत रिकामा केला असता."
Amit Shah,Narendra Modi, Uddhav Thackeray,Sanjay Raut
Amit Shah,Narendra Modi, Uddhav Thackeray,Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Dec : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या आमदार, खासदारांसह नेत्यांमध्ये अस्वस्थता असून ते आता महायुतीच्या (Mahayuti) संपर्कात असल्याचा दावा भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नेत्यांकडून केला जात आहे.

अशातच आता भाजप राज्यात 'ऑपरेशन लोटस' करणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. याच सर्व चर्चांवर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुतीसह भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवाय केंद्रीय यंत्रणा आमच्याकडे असत्या तर पंधरा मिनिटांत भाजप रिकामा केला असता असा दावाही त्यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "महायुतीकडे सत्ता आहे, प्रचंड लुटलेला काळा पैसा आहे. त्यांच्याकडे पोलिस, ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा यंत्रणा आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीतील आमदार आणि नेते संपर्कात असल्याचा दावा ते करू शकतात. मात्र, जर या यंत्रणा आमच्याकडे असत्या, तर अख्खा भाजप (BJP) आम्ही पंधरा मिनिटांत रिकामा केला असता."

Amit Shah,Narendra Modi, Uddhav Thackeray,Sanjay Raut
Maharashtra Politics : अदानींच्या निवासस्थानी भाजप आणि शरद पवारांच्या नेत्यांमध्ये चर्चा, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता

यावेळी त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर भाजपवाले देश सोडून पळून जातील अशी टीकाही केली आहे. ते म्हणाले, "बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून जातील. यात अनेक मोठे नेतेही असू शकतात. या गोष्टी आम्हाला सांगू नका.

आम्ही कुणालाही घाबरत नाही. पक्षासाठी आम्ही तुरुंगवास भोगला आहे. आता आम्ही सभ्य झालो आहोत. जोपर्यंत आम्ही सभ्य आहोत, तोपर्यंत आम्ही सभ्यतेने राहू. महाराष्ट्राच्या मूळावर येण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena) आहे आणि त्या 105 हुतात्म्यातील पहिला हुतात्मा संजय राऊत असेल.

Amit Shah,Narendra Modi, Uddhav Thackeray,Sanjay Raut
Mahayuti Cabinet Expansion : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच? शिंदेंपाठापोठ 'या' खात्यासाठी भाजपकडून अजितदादांचीही कोंडी?

एकनाथ शिंदेंना कोणी विचारत नाही

दरम्यान, काही लोकांना मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रुग्णवाहिका तयार ठेवल्या पाहीजेत. एकनाथ शिंदेंना आता कोणी विचारत नाही. त्यांची नाराजी किंवा आनंद हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. शिंदे, अजित पवारांबरोबरचे आमदार हे कळसूत्री बाहुलीप्रमाणे असून आता ते गुलाम झाले आहेत. गुलामांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे, ती यांच्याकडे नाही. ते डरपोक लोक आहेत, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना डिवचलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com