Nana Patole: मोठी बातमी! विधानसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का? पटोलेंचं थेट खर्गेंना पत्र

Nana Patole Resignation Request to Congress President : काँग्रेसकडून येत्या एक दोन दिवसांत बैठक घेण्यात येणार असल्याचे व त्यामध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून सर्व जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी केली आहे.
Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस महाआघाडीने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे मनोबल ढासळले होते. विधानसभेत किती जागा मिळतील, याची खात्री त्यांच्या एकाही नेत्याला नव्हती.

काँग्रेस आघाडी सत्तेत येईल, अशी धास्तीही त्यांना होती. यानंतरही काँग्रेस पक्षाचा दारुण झालेला पराभव अनाकलनीय आहे. त्यातच काँग्रेसकडून येत्या एक दोन दिवसांत बैठक घेण्यात येणार असल्याचे व त्यामध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून सर्व जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी केली असल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलणार याची जोरदार चर्चा सध्या काँग्रेसमध्ये आहे. नव्या अध्यक्षाची चाचपणी करायला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूर येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाईल अशीही चर्चा सुरू आहे. त्यासोबतच काही काँग्रेस नेत्यांनी त्यांची हायकमांडकडे तक्रार केली असल्याचे समजते.

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Shivsena Politics : शिवसेनेला मंत्रिपद मिळणार 10 ते 12? दावेदार 20 ते 22; एकनाथ शिंदे विधानपरिषदेचे सभापतीपद खेचून घेणार

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र लिहले आहे. त्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी संभाळली आहे. त्यामध्ये राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे मला या सर्व जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करुन नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची भूमिकाही त्यांनी या पत्रातून मांडली असल्याचे समजते.

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Vijay Wadettiwar Video : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणणारा 'पुष्पा' कोण? विजय वडेट्टीवारांनी नावच सांगितले

दरम्यान, विधानसभा निकालानंतरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन नाना पटोले पायउतार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, नाना पटोले यांनी राजीनाम्याचा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच, नाना पटोले यांनी स्वत:च राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष पदातून पदमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती आहे. त्यामुळे, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसमध्येही नाना पटोले यांना काही बड्या नेत्यांचा अंतर्गत विरोध असल्याची माहिती आहे. त्यातच काँग्रेसचा विधिमंडळ नेता निवडीसाठी १७ डिसेंबरला बैठक होणार असल्याचे समजते. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. .

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Uddhav Thackeray : 'बांगलादेशात मंदिर जाळली, हिंदूंवर अन्याय वाढलेत, 'विश्वगुरू' कोठेय?' ठाकरेंनी भाजपचा बुरखा फाडला ...पाहा VIDEO

दरम्यान, या सर्व घडामोडींवर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रोखठोक मत व्यक्त केले. लोकसभेच्या निवडणुकीतील विजयाचे श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतले. त्यांच्यावरच विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबादार येईल, असे सांगून त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट केले. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले होते. त्याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः घेतले होते. त्यामुळे सहाजिकच पराभवाची जबाबदारी त्यांच्यावरच येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Ambadas Danve News : परभणीच्या हिंसाचाराबाबत अंबादास दानवेंना 'ही' शंका अन् केला गंभीर आरोप, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com