
Jammu And Kashmir News: काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद या कोणत्या कोणत्या कारणांमुळे सातत्यानं चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी थेट भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या जाडेपणावर केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. आता याच शमा मोहम्मद (Shama Mohamad) यांनी यावेळी पाकिस्तानला कायमस्वरुपी धडा शिकवण्याचं मागणी केली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी(ता.22)दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात आता काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनीही ट्विट करत थेट रावळपिंडी उध्वस्त करत पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा असं म्हटलं आहे.
शमा मोहम्मद ट्विटमध्ये म्हणतात,रावळपिंडीला उध्वस्त करायला हवं,आता चर्चा नको,व्यापार नको, क्रिकेट नको, सांस्कृतिक कार्यक्रम नको. पाकिस्तानला विसरता येणार नाही, असा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. जय हिंद या आशयाचं ट्विट करत शमा यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला (Pahalgam Terrorist Attack) मंगळवारी(ता.22) करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. हा हल्ला पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी घडवून आणला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या पहलगाममधील हल्ल्यानंतर मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटक मारले गेले आणि अनेकजण जखमी झाल्याची बातमी अतिशय निंदनीय आणि काळीज पिळवटून टाकणारी आहे. मी शोकाकुल कुटुंबीयांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे वाटेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यात महाराष्ट्रात, कर्नाटक,राजस्थानसह इतर ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे मोदी सरकार काय कठोर भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.