Salil Deshmukh :अजित पवारांच्या भेटीला सलील देशमुख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता?

Salil Deshmukh meet Ajit Pawar : काटोल विधानसभा मतदारसंघात तब्बल अनिल देशमुख पाचवेळा निवडूण आले होते. 1995 पासून त्यांच्या गाडीवर लागलेला लाल दिवा 2014 मध्ये पाच वर्षांसाठी उतरला होता.
Salil Deshmukh meet Ajit Pawar
Salil Deshmukh meet Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Salil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फक्त दहा आमदार निवडून आले आहेत. विदर्भात एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले असल्याने विदर्भातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अजित पवार यांच्याकडे जाण्याची तयारी करीत आहेत. अनेकांनी प्रवेश घेऊन आपली जागा नक्की केली असताना आज शरद पवार यांचे विश्वासू, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी विजयगडवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. हे बघता आता उरले सुरले शरद पवारांचे शिलेदारही दादांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार 40 आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. त्यावेळी सलील देशमुख यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यास सांगितले होते. याकरिता पुरेसा वेळही दिला होता मात्र त्यांनी नकार दिला होता. सलील देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार यांनी उमेदवारी दिली होती. भाजपचे चरणसिंग ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवाने सुमारे 30 वर्षांनंतर कोटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील देशमुख संपुष्टात आली आहे.

Salil Deshmukh meet Ajit Pawar
Santosh Deshmukh : प्रतिमा उजळली असती, सरकारने 'ही' संधी गमावत स्वतःचीच परीक्षा घेतली!

काटोलसह हिंगणा आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता आली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे आता पाच वर्षे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात फारसा स्कोप दिसत नसल्याने अनेकांनी दादांना साकडे घालणे सुरू केले आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघात तब्बल अनिल देशमुख पाचवेळा निवडूण आले होते. 1995 पासून त्यांच्या गाडीवर लागलेला लाल दिवा 2014 मध्ये पाच वर्षांसाठी उतरला होता. महाविकास आघाडीचे सरकार येताच तो पुन्हा लागला. अडीच वर्षे ते राज्याचे गृहमंत्री होती. या निवडणुकीत मुलाच्या आग्रहाखातर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. सलील देशमुख जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. पहिल्याच प्रयत्नात ते जिल्हा परिषदेची निवडूक जिंकले असले तरी विधानसभेत त्यांना अपयश आले. पुढील राजकीय भवितव्याचा विचार करून त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली असल्याचे समजते.

Salil Deshmukh meet Ajit Pawar
Priyanka Gandhi : भाजप खासदारांनी प्रियांका गांधींना दिले खास ‘गिफ्ट’; करून दिली ‘त्या’ घटनेची आठवण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com