Neelam Gorhe : विधानपरिषदेत सभापतींच्या खुर्चीवर बसलेल्या नीलम गोऱ्हेंना ठाकरेंच्या आमदाराने नैतिकताच शिकवली

Legislative Council Maharashtra News : एखाद्यावर अविश्वास ठरावा आणला गेला असताना त्या खुर्चीवर बसणे हे नैतिकतेला धरून आहे का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. याबाबत सभागृहाच्या सचिवालयाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी परब यांनी केली.
Neelam Gorhe
Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा चौथा दिवस होता. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने महायुती सरकार बॅकफुटवर आल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसापासून अधिवेशन काळात सत्ताधारी व विरोधकांत जोरदार जुगलबंदी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. त्यातच बुधवारी महाविकास आघाडीने विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव आणला आहे. एखाद्यावर अविश्वास ठरावा आणला गेला असताना त्या खुर्चीवर बसणे हे नैतिकतेला धरून आहे का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. याबाबत सभागृहाच्या सचिवालयाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी परब यांनी केली.

ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव असताना त्या सभापतीपदाच्या खुर्चीवर कशा काय बसल्या ? असा सवाल विचारत त्यावर आक्षेप घेतला. एखाद्यावर अविश्वास ठरावा आणला गेला असताना त्या खुर्चीवर बसणे हे नैतिकतेला धरून आहे का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. परब यांच्या प्रश्नामुळे काहीकाळ सभागृहातील वातावरण तापले होते.

Neelam Gorhe
Shivsena : एकनाथ शिंदेंचा 'सेफ गेम'; रायगड अन् नाशिकमध्ये संपर्क मंत्रीच नाही, पालकमंत्री पदाचा क्लेम कायम!

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप केल्यानंतर नीलम गोऱ्हे या ठाकरे गटाच्या रडारवर आहेत. महाविकास आघाडीने आता त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर महाविकास आघाडीकडून अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. सभापती राम शिंदे यांच्याकडे बुधवारी तशा आशयाचे पत्रही देण्यात आले. त्यानंतर गुरुवारी नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेत आल्या आणि त्यांनी कामकाजात सहभाग नोंदवला. सभापतींच्या गैरहजेरीत त्या सभापतींच्या खुर्चीत बसल्या. त्यावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला.

Neelam Gorhe
Eknath Shinde : सामंतांनी डाव फिरवला; शिंदेंना सेफ करत CM फडणवीसांना आणलं गोत्यात

आपल्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. नैतिकतेला धरून आपण या खुर्चीवर बसणार नाही असं आम्हाला वाटलं होत. कारण सकाळी सभागृहात आपण येऊन सभापती खुर्चीवर न बसता सभागृहात बसलात. कदाचित आपण नैतिकतेला धरून अविश्वास ठरावावर निर्णय होत नाही तोपर्यंत सभापतींच्या खुर्चीवर बसणार नाहीत, असे आम्हाला वाटलं होतं. परंतु आता आपण खुर्चीवर बसला आहात. मला सचिवालयाला विचारायचे आहे की नेमके अविश्वास ठरावाबाबत काय नियम आहेत? असा सवाल आमदार अनिल परब यांनी विचारला.

Neelam Gorhe
Mahayuti : शिवसेना-भाजपला कॉर्नर करण्याचे अजितदादांचे नियोजन; 9 मंत्र्यांकडे देणार मोठी जबाबदारी

यावेळी परबांना उत्तर देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 'तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. या आधीही अनेकांवर अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. त्यामुळे माझ्यावरच मी बोलणे योग्य नाही. तुम्ही जे विचारलं आहे त्यावर समाधानकारक उत्तर दिले जाईल. गेल्या वेळीही माझ्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला होता. त्यावेळी अविश्वासदर्शक ठराव दाखल झाला तरी ती व्यक्ती दैनदिन कारभारात भाग घेऊ शकते असे आधीच्या वेळी सांगितले होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com