Mahayuti News : महायुतीत महापौरपदाचा नवा फॉर्म्युला; एकनाथ शिंदेंच्या लाडक्या नेत्याने आणला समोर

Mahayuti mayor formula News : येत्या काळात मुंबईत ज्याचे जास्त नगरसेवक किंवा ज्याचा अगोदर महापौर होतो, त्याचाच महापौर असा फॉर्म्युला ठरला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते.
Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Mahayuti Politics Local Body Elections 2025Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षात मोठ्या हालचाली होत आहे. महायुतीमध्ये एकांतः शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असे तीन पक्ष एकत्र आहेत. मुंबईत भाजप आणि शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत ज्याचे जास्त नगरसेवक किंवा ज्याचा अगोदर महापौर होतो, त्याचाच महापौर असा फॉर्म्युला ठरला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते.

त्यामुळे आता काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच हा फॉर्म्युला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व मंत्री प्रताप सरनाईक यांनी समोर आणला आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीचा फड रंगणार आहे. राज्यातील जवळपास 29 महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून भाजपाचे (BJP) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर मोठे विधान केले आहे.

चव्हाण यांच्या याच विधानावर आता शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी महायुतीत महापौरपदाचा नवा फॉर्म्यूला समोर आणला आहे. प्रताप सरनाईक यांच्या नव्या विधानानंतर आता अजितदादांची अडचण होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
BJP Poitics : भाजपची बारामतीसाठी चौफेर फिल्डिंग, पवारांना धक्का देणार! 6 पैकी 5 मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम

आगामी काळात होत असलेल्या महापालिकेच्या निवडणुका आणि महापौरपद यावर भाष्य केले आहे. हे महायुतीचे सरकार आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा महापौर होता. तिथे त्याच पक्षाला महापौरपद दिले पाहिजे. ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याच पक्षाला महापौरपद मिळाला पाहिजे ही महायुतीची सूत्रे असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या हाताखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली हे सरकार उत्तम काम करत आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
NCP Politics: शर्यतीतील दिग्गज नेत्यांचा पत्ता कट? नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंच्या नावाची चर्चा; 'या' आहेत जमेच्या बाजू

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतच लढवणार आहोत. हे ठरवल्यामुळे ज्या पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये पूर्वीपासून होती, पूर्वीपासून ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक महापालिकेत निवडून येत होते, त्या पक्षाचा महापौर, द्वितीय स्थानावर ज्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले, त्या पक्षाला उपमहापौरपद तसेच तृतीय स्थानावर असलेल्या पक्षाला स्थायी समितीचे अध्यक्षपद, अशा प्रकारचे महायुतीत वाटप केले जाते, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Pratap Patil Chikhlikar: सोळा निवडणुका जिंकल्या! चार दशकं राजकारणात; प्रताप पाटील चिखलीकरांचा असा आहे फिटनेस

महायुतीबाबतच अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेच घेतील. ते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे, असेही सरनाईक म्हणाले. आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मला फार मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
BJP Poitics : भाजपची बारामतीसाठी चौफेर फिल्डिंग, पवारांना धक्का देणार! 6 पैकी 5 मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com