Nitesh Rane Warrant : मंत्री नितेश राणेंना मोठा झटका, संजय राऊतांच्या विरोधातील 'त्या' वक्तव्यावर अजामीनपात्र वाॅरंट

Nitesh Rane VS Sanjay Raut : नितेश राणे हे संजय राऊत यांच्यावर जहरी टीका करत असतात. 2023 च्या मे महिन्यात राणे यांनी राऊत यांच्यावर टीका करत असताना त्यांचा साप म्हणून उल्लेख केला.
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane News : मत्स व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना संजय राऊत यांच्या विरोधात केलेले वक्तव्य भोवले आहे. राऊत यांनी नितेश राणेंच्या विरोधात 2023 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात नितेश राणेंच्या विरोधात माझगाव कोर्टाने अजामीनपात्र वाॅरंट जारी केले आहे.

गेल्याच महिन्यात सुनावणीला हजर राहिले नसल्याने कोर्टाने राणे यांच्या विरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी केले होते. मात्र, दोन जूनला त्यांनी कोर्टात कायमस्वरूपी सुनावणीसाठी गैरहजर राहण्यासाठी अर्ज केला होता.

राणेंच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायमुर्ती ए.ए. कुलकर्णी यांनी राणेंचा अर्ज फेटाळत त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी केले. तसेच सुनावणी 18 जुलैपर्यंत तहकूब केली.

'साप' उल्लेख भोवला

नितेश राणे हे संजय राऊत यांच्यावर जहरी टीका करत असतात. 2023 च्या मे महिन्यात राणे यांनी राऊत यांच्यावर टीका करत असताना त्यांचा साप म्हणून उल्लेख केला. जाहीर सभेत ते म्हणाले की, संजय राऊत साप आहे ते कधीही उद्धव ठाकरेंना धोका देऊन शरद पवारांच्या पक्षात जातील.

Nitesh Rane, Sanjay Raut
Raj Thackrey Politics: राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे धर्म संकटात; इकडे आड तिकडे विहीर स्थिती!

अटकेची टांगती तलवार

नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. संजय राऊत हे तर त्यांच्या टार्गेटवर कायम असल्याचे पाहण्यास मिळते. राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याच्या सुनावणीला देखील ते अनेकदा गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे आता न्यायालयाने त्यांना दिलास न देता त्यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी केले आहे. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, याआधी देखील न्यायालयाने या खटल्याने राणे हे सुनावणीला उपस्थित राहत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती.

Nitesh Rane, Sanjay Raut
Shivajirao Naik : अजित पवारांची मोठी राजकीय चाल? जयंत पाटलांच्या कट्टर विरोधकाची केली प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com