HSRP Number Plate : तुमच्या गाडीवर अजूनही HSRP नाही? आजपासून दंड की जप्ती? RTOने सांगितलं...

HSRP registration last date Maharashtra : HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर आजपासून कारवाई सुरू. दंड किंवा वाहन जप्ती होण्याची शक्यता. RTO चे नवे नियम जाणून घ्या.
HSRP Number Plate Deadline Extended in Maharashtra
HSRP Number Plate Deadline Extended in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

तुमच्या वाहनावर अजूनही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच HSRP बसवलेली नसेल, तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक वाहनधारकांनी अद्याप HSRP साठी नोंदणी केलेली नाही. 31 डिसेंबरची अंतिम मुदतही संपली असून, आता परिवहन विभाग आणि आरटीओकडून थेट कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र परिवहन विभागाने सुरुवातीला HSRP बसवण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 निश्चित केली होती. त्यानंतर ती 30 जून, 15 ऑगस्ट, 30 नोव्हेंबर आणि अखेर 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. एवढ्या वेळा संधी देऊनही राज्यातील मोठ्या संख्येने वाहनांवर अजूनही जुनी नंबर प्लेट असल्याचे दिसून येत आहे.

HSRP Number Plate Deadline Extended in Maharashtra
AAP sarpanch murder : मांडव रक्ताने माखला! AAP सरपंचाची भर लग्नात गोळ्या झाडून हत्या; हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद!

HSRP न बसवलेल्या वाहनांवर केवळ दंडच नव्हे, तर इतर अडचणीही येऊ शकतात. अशा वाहनांचे ट्रान्सफर, कर्ज व्यवहार, री-रजिस्ट्रेशन, वाहनांमध्ये बदल तसेच लायसन्स नूतनीकरण यांसारख्या सेवा थांबवण्यात येऊ शकतात. वाहनांची संख्या मोठी असल्याने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाईल का, याबाबत चर्चा सुरू असली तरी परिवहन विभागाने याबाबत ठोस घोषणा केलेली नाही.

कारवाई टाळायची असेल, तर वाहनधारकांनी तातडीने HSRP साठी नोंदणी करणे गरजेचे आहे. विशेषतः 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी ही नंबर प्लेट अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट शिक्षा होणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

HSRP Number Plate Deadline Extended in Maharashtra
Mumbai High Court : बिनविरोध निवडणूक आलेल्या उमेदवारांचे नगरसेवकपद जाणार? मनसेची कोर्टात धाव; निवडणूक अधिकाऱ्यांनाही भेटले!

दंडाबाबत बोलायचे झाल्यास, पहिल्यांदा पकडले गेल्यास सुमारे 1000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. मात्र, पुन्हा एकदा नियम मोडल्यास हा दंड 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर transport.maharashtra.gov.in वर जाऊन नोंदणी करून आवश्यक शुल्क भरावे. नोंदणीची पावती जवळ ठेवल्यास तपासणीदरम्यान कोणतीही कारवाई होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com