Sugar Mills Notices : मोठी बातमी! 29 साखर कारखान्यांना झटका, आयुक्तांनी पाठवल्या नोटिसा

Sugar Mills FRP Dues: 31 मार्च 2026 अखेरच्या थकबाकीपैकी 80 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिलेल्या 53 कारखान्यांपैकी 24 कारखान्यांच्या सुनावण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या आहेत.
Sugar Commissioner issues notices to 29 mills over pending FRP payments to farmers in Maharashtra
Sugar Commissioner issues notices to 29 mills over pending FRP payments to farmers in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Sugar mill regulation: राज्यातील 2025-26 हंगामातील सुमारे 1 हजार 12 कोटी रुपयांच्या थकीत एफआरपीबद्दल साखर आयुक्तालयाने 29 साखर कारखान्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. या प्रकरणी साखर संकुल येथे येत्या सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी होणार असल्याची माहिती साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिली आहे.

ऊसाचे रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) शेतकऱ्यांना वेळेत न मिळाल्याने सातत्याने वसुलीची मागणी होत आहे. 31 मार्च 2026 अखेरच्या थकबाकीपैकी 80 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिलेल्या 53 कारखान्यांपैकी 24 कारखान्यांच्या सुनावण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित २९ कारखान्यांना आता नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सुनावणीत कारखान्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे.

शेतकऱ्यांना या 29 कारखान्यांकडून एकूण 3 हजार 74 कोटी 33 लाख रुपये देय होते. त्यापैकी 2 हजार 61 कोटी 89 लाख रुपये बँक खात्यावर जमा झाले आहेत. मात्र, अद्याप 1 हजार 12 कोटी 44 लाख रुपये थकीत आहेत. सुनावणीत कारखान्यांकडून थकबाकीचे कारण, नोटिसा मिळाल्यानंतर किती रक्कम जमा केली, याचीही माहिती घेतली जाईल. त्यानंतर एफआरपीबाबत पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Sugar Commissioner issues notices to 29 mills over pending FRP payments to farmers in Maharashtra
Babasaheb Patil: खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्यानं थकवले 9 कोटी; 38 कारखान्यांकडे कोट्यवधीची थकबाकी

ऊस नियंत्रण आदेशानुसार, कारखान्याने उसाचा पुरवठा झाल्यापासून 14 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपी जमा करणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास 15 टक्के दराने व्याज आकारले जाऊ शकते. यासाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) अंतर्गत कारवाईही होऊ शकते.

थकीत FRP जिल्हानिहाय कारखाने

साखर आयुक्तालयाने नोटिसा बजावलेल्या कारखान्यांमध्ये मुख्यतः कोल्हापूर 3, सांगली 2, सोलापूर 3, सातारा 1, नाशिक 1, परभणी 1, छत्रपती संभाजीनगर 3, लातूर 2, धाराशिव 3, परभणी 1, जालना 1, नांदेड 1, हिंगोली 1, पुणे 1, नंदुरबार 1, अहिल्यानगर 1 आणि बीड जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांचा समावेश आहे.

Sugar Commissioner issues notices to 29 mills over pending FRP payments to farmers in Maharashtra
Nashik Crime : आठ महिलांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव! तब्बल चार वर्ष अत्याचार, पोलिसही हादरले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com