Video Laxman Hake : मनोज जरांगे बिनबुडाचा लोटा, 'ते' लढणार नाहीत; ओबीसी नेत्याचा घणाघात

Laxman hake OBC Reservation Maratha Reservation : आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला आमचा पाठींबा आहे. राज्यातील बोगस कुणबी नोंदीवर आम्ही आक्षेप घेतला होता. मात्र, त्यावर सरकारने काहीही कारवाई केलेली नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Laxman Hake News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढण्यासाठी आम्ही 29 ऑगस्टला निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. जरांगे पाटील यांनी राजकीय पक्षांना 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जरांगे पाटील एकही उमेदवार उभा करणार नाहीत, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील हे बिनबुडाचा लोटा आहे. 'तो' 288 काय पण एकही जागेवर उमेदवार उभा करणार नाही, असे सांगून हाके यांनी जरांगे पाटलांना टार्गेट केले.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असे सांगितले. मात्र, ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त केले त्यांच्या पक्षाला त्यांनी पाठींबा दिला. आणि ओबीसी उमेदवारांना विरोध केला, असा आरोप हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला.

Manoj Jarange
Video Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस रॅली काढणार! मनोज जरांगेंनी दिलं चॅलेंज, 'काही करा...'

लोकसभा निवडणुकीत त्यांनी ओबीसी नेतृत्वाला विरोध केला. विधानसभेत जरांगे पाटील एकही उमेदवार उभा करणार नाहीत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपल्या सोयीच्या पक्षाला पाठींबा जाहीर करतील,असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

सर्वपक्षीय बैठकीला पाठींबा

आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला आमचा पाठींबा आहे. राज्यातील बोगस कुणबी नोंदीवर आम्ही आक्षेप घेतला होता. मात्र, त्यावर सरकारने काहीही कारवाई केलेली नाही. मनोज जरांगे आपल्या भाषणात आम्ही क्षत्रिय मराठे आहोत, हे सांगत वर्णवर्चस्वाची भाषा करतायेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना रेड कार्पेट घालत आहेत, असे हाके म्हणाले.

Manoj Jarange
V Radha Transfer : 'भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा...'; व्ही. राधा यांच्या बदलीवरून वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com