Shivsena Split : ठाकरेंचे फुटलेले खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत? लोकसभा अध्यक्षांना पत्र!

Om Rajenimbalkar sanjay Jadhav sanjay Deshmukh : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या गटातून फुटलेले खासदार विलीन होणार असल्याची माहिती आहे.
Speculation intensifies over the possible entry of key Shiv Sena (UBT) MPs into Eknath Shinde's Shiv Sena, potentially reshaping Maharashtra's political landscape.
Speculation intensifies over the possible entry of key Shiv Sena (UBT) MPs into Eknath Shinde's Shiv Sena, potentially reshaping Maharashtra's political landscape.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. फुटलेल्या खासदारांनी आज सकाळी नऊ वाजता लोकसभा अध्यक्षांना पत्र देत आपला गट एकनाथ शिदेंच्या शिवसेनेत विलीन केल्याचे सांगितले आहे. या विषयीचे वृत्त 'आज तक' या वृत्तवाहिनीने दिला आहे.

मंगळवारी रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या घडामोडी घडल्या. खासगी विमानांनी खासदार दिल्लीत पोहोचले होते. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांचा मोठा गट बाहेर पडत असल्याची चर्चा होती. त्यानंतर हे सहा खासदार नाॅट रिचेबल झाल्याने ते बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा होती.

आज दिल्लीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये केवळ तीनच खासदार उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले.

संजय जाधव , संजय देशमुख, नागेश पाटिल अष्टीकर , ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे और संजय दीना पाटिल या खासदारांनी नवीन गट स्थापन केल्याची माहिती आहे. यांच्या स्वाक्षरी असलेले पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे.

Speculation intensifies over the possible entry of key Shiv Sena (UBT) MPs into Eknath Shinde's Shiv Sena, potentially reshaping Maharashtra's political landscape.
Omprakash RajeNimbalkar news : ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या बंडाचे मतदारसंघात जोरदार पडसाद; नगरसेवकांनी उचललं मोठं पाऊल...

उद्धव ठाकरेंच्यासोबत कोण?

नऊ पैकी तीन खासदार हे उद्धव ठाकरेंच्यासोबत आहेत. त्यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या समावेश आहे. दरम्यान, संजय दिना पाटील यांनी आपल्या पक्ष सोडला नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Speculation intensifies over the possible entry of key Shiv Sena (UBT) MPs into Eknath Shinde's Shiv Sena, potentially reshaping Maharashtra's political landscape.
Shiv Sena News: शिवसेनेच्या 60 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड कोणते? एकाचवेळी किती आमदार, खासदार गेले होते सोडून

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com