Onion Truck Robbed : 'महाराष्ट्र शासन’चा गाडीतून आले थेट कांद्याचा ट्रक लुटला; समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार, चार जणांना अटक!

Samruddhi Expressway Four Arrested : नाशिकहून कांदा घेऊन हा ट्रक झारखंडच्या दिशेने निघाला होता. समृद्धी महामार्गावर डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘महाराष्ट्र शासन’ असा फलक लावलेल्या गाडीतून आलेल्या चार जणांनी हा ट्रक लुटला.
Onion truck robbed on Samruddhi Expressway four arrested
Onion truck robbed on Samruddhi Expressway four arrestedsarkarnama
Published on: 
Updated on: 

संजय जाधव

Crime News : ‘महाराष्ट्र शासन’ असा बोर्ड आणि सायरन लावलेल्या आलिशान स्कोडा कारमधून आलेल्या चार जणांनी समृद्धी महामार्गावर कांद्याने भरलेला ट्रक लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी नाशिकहून झारखंडकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अडवला. ट्रकचालकाला बेदम मारहाण करून मध्यरात्री महामार्गावरच सोडून देत आरोपी ट्रक घेऊन पसार झाले.

शनिवारी (26 सप्टेंबर) मध्यरात्री ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी काही तासांतच कारवाई करत स्कोडा कारसह चार संशयितांना वाशिम जिल्ह्यातून ताब्यात घेत अटक केली. या चौघांना शनिवारी मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून कांदा घेऊन हा ट्रक झारखंडच्या दिशेने निघाला होता. समृद्धी महामार्गावर डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘महाराष्ट्र शासन’ असा फलक आणि सायरन लावलेल्या स्कोडा कारमधून चार जण आले. या चौघांनी ट्रक अडवला. त्यानंतर चालकाला मारहाण करून ट्रक ताब्यात घेतला आणि चालकाला मध्यरात्री महामार्गावरच सोडून आरोपी ट्रक घेऊन पसार झाले.मारहाणीत चालक गंभीर जखमी झाला.

Onion truck robbed on Samruddhi Expressway four arrested
Bishnoi Gang In Kolhapur : कोल्हापूर कोर्टात ‘007 बिष्णोई टोळी’चा थरार; पळण्याचा प्रयत्न फसला, दोघे अटकेत

112 वर फोन; पोलिसांची तातडीने धाव

ट्रकचालकाने आरोपी निघून गेल्यानंतर तातडीने 112 या आपत्कालीन पोलिस क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी चालकाला पोलिसांनी रुग्णवाहिकेतून मेहकर येथे उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यानंतर पोलिसांनी समृद्धी महामार्गाच्या कंट्रोल रूमला घटनेची माहिती देत आरोपींच्या वाहनाचा शोध सुरू केला. काही तासांत ट्रकसह चार जणांना वाशिम जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Onion truck robbed on Samruddhi Expressway four arrested
Latur ZP News : दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असणाऱ्या ZP अध्यक्षांच्या बंगल्यातच चोरी! 12 लाखांची रोकड अन् सोन्याचे दागिने लंपास

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com