Latur ZP News : दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असणाऱ्या ZP अध्यक्षांच्या बंगल्यातच चोरी! 12 लाखांची रोकड अन् सोन्याचे दागिने लंपास

Latur Zilla Parishad President Residence Theft : लातूरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Latur Zilla Parishad President Usha Patil
Latur Zilla Parishad President Usha Patilsarkarnama
Published on
Updated on

Latur Crime News : लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. मतदारसंघातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जिल्हा परिषद अध्यक्षा गेल्या असताना त्यांचे निवासस्थान चोरट्यांनी लक्ष करत 12 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या बातमीनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषा संभाजी पाटील तळेगावकर या लातूर जिल्हा परिषदेच्या लातूर शहरातील शासकीय बंगल्यात राहत आहेत. १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्या व त्यांचे पती संभाजी पाटील तळेगावकर घरा बाहेर गेले होते. ते मतदारसंघातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर होते.

यावेळी घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. अंदाजे १२ लाख रुपये रोकड आणि चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. यात सोन्याचे झुमके, मंगळसूत्र, सरपाळे आणि चार गोटे असे दागिने होते. कपाटातील कागदपत्रे व कपडेही अस्ताव्यस्त करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.

Latur Zilla Parishad President Usha Patil
Bhiwandi Crime News : भिवंडीत भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल; दारू पाजून अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप

यानंतर या चोरीची माहिती अध्यक्षा तळेगावकर आणि त्यांचे पती संभाजी पाटील तळेगावकर यांना फोनवरून देण्यात आली. यानंतर दौरा आटोपता घेत अध्यक्षा तळेगावकर आणि त्यांचे पती घरी परतले. यावेळी सर्व गोष्टी पाहिल्या. यावेळी घरच्या मुख्य दरवाजाचा लॉक तोडण्यात आला होता. तसेच आत तिजोरीचे सॉक देखील तोडण्यात आले होते. नंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. चोरी नेमकी कोणत्या वेळी आणि कोणत्या पद्धतीने करण्यात आली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Latur Zilla Parishad President Usha Patil
Crime News : धक्कादायक! पोलिसानेच भररस्त्यात कढली महिलेची छेड, पाठलाग करत अश्लील कमेंट...; बहिणीने शूट केला व्हिडिओ

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार चोरी गेलेल्या रोकड आणि दागिन्यांचा तपशीलही तपासला जात आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या चोरीनंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com