Operation Tiger Rumor : उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, शिंदेसोबत खासदारांच्या बैठकीची चर्चा; अरविंद सावंतांना मातोश्रीवर घेतले बोलावून

Shivsena News : ठाण्यात दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा दावा केला जात आहे. या अफवेने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
Uddhav-Thackeray
Uddhav-ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : ठाण्यात दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा दावा केला जात आहे. या अफवेने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच दोन्ही शिवसेनेकडून या अफवा असल्याचे सांगत या गुप्त भेटीचा दावा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेनी या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे राज्यातील 'ऑपरेशन टायगर'ची ही बैठक केवळ अफवाच ठरली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले असून त्यांनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतले असून या बैठकीत त्यांनी काही सूचना केले असल्याचे पुढे आले आहे.

ठाण्यातील या बैठकीविषयीचे वृत्त बाहेर येताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांनी तातडीने प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बैठक पार पडली. त्यामध्ये आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून हे वृत्त देणाऱ्या संस्थेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु करण्यात आली असल्याचे समजते. त्याबाबत ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ठोस पावले उचलली आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav-Thackeray
Operation Tiger : एकनाथ शिंदेंच्या बैठकीबाबत श्रीकांत शिंदेंचा मोठा खुलासा, 'ऑपरेशन टायगरची वर्षभरापासून...'

ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमी संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात काम केले जात असल्याची माहिती आहे. यादृष्टीने उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. कुठल्याही प्रकारे पुरावे नसताना चुकीचे वृत्त छापून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित वृत्तपत्राला नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यासोबतच खॊडसाळपणाचे वृत्त देणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Uddhav-Thackeray
Operation Tiger : एकनाथ शिंदेंच्या बैठकीबाबत श्रीकांत शिंदेंचा मोठा खुलासा, 'ऑपरेशन टायगरची वर्षभरापासून...'

उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, खासदार फुटणार याबाबत चर्चा झाली नाही, उलट त्यांनी माझं कौतुक केलं. आजच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार नव्हती. आजची बैठकी ही शिवसेना आणि भारतीय कामकार सेनेच्या कारभाराबाबत होती. तुम्हा सर्वांना कल्पना आहे की मी दैनंदिन मातोश्रीवर येतो. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, मातोश्रीचा विश्वास आहे.’

Uddhav-Thackeray
Operation Tiger : ऑपरेशन टायगर? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला एक खासदार गैरहजर, फोटो आले समोर...

बुधवारी रात्री ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांची ही बैठक पार पडल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांना भेटल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उशीरा सुरु झालेली ही बैठक पहाटेपर्यंत सुरु होती, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित असल्याचे त्यामध्ये म्हटले होते.

Uddhav-Thackeray
Operation Tiger : ऑपरेशन टायगर? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला एक खासदार गैरहजर, फोटो आले समोर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Devendra Fadnavis And Eknath Shinde
Eknath Shinde, Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Uddhav, Raj thackeray
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com