Manohar Joshi : "लोकसभा अध्यक्ष असताना मनोहर जोशींनी मराठी बाणा दिल्लीत दाखवला," अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve On Manohar Joshi Death : "शिवसेनाप्रमुखांनंतर शिवसेनेत मनोहर जोशी यांचं नेतृत्व सर्वात मोठं होतं," असंही अंबादास दानवेंनी म्हटलं.
Ambadas Danve | Manohar Joshi
Ambadas Danve | Manohar JoshiSarkarnama
Published on
Updated on

Manohar Joshi Death News : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कडवट शिवसैनिक मनोहर जोशी ( Manohar Joshi ) यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानं मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

यानंतर मनोहर जोशी यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. "मनोहर जोशी यांच्या निधनानं शिवसेना आणि महाराष्ट्राचं नुकसान झालं," अशी प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. ( Manohar Joshi Passed Away News )

Ambadas Danve | Manohar Joshi
Manohar Joshi Passes Away: मनोहर जोशींकडे मुख्यमंत्रिपद, पण रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे…!

अंबादास दानवे ( Ambadas Danve ) म्हणाले, "शिवसेनाप्रमुखांनंतर शिवसेनेत मनोहर जोशी यांचं नेतृत्व सर्वात मोठं होतं. नगरसेवकापासून लोकसभेच्या अध्यक्षांपर्यत एक शिवसैनिक पोहाेचू शकतो, हे मनोहर जोशी यांनी दाखवून दिलं. त्या जबाबदाऱ्या मनोहर जोशी यांनी पारही पाडल्या. शिस्त, काटेकोरपणा, संघटनेप्रती निष्ठा मनोहर जोशी यांच्याकडून शिकली पाहिजे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशी यांना राजीनामा देण्यास सांगितला. तेव्हा, कारण न विचारता मनोहर जोशी यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. आजच्या काळात पदासाठी चिटकून राहणं आणि अनेक पक्ष बदलणारे लोक आहेत. पण, मनोहर जोशी यांनी एका पत्रावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. याचा आदर्श सर्व आता राजकारणात असलेल्या पिढीनं घेतला पाहिजे. यामुळे शिवसेनेचं आणि महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे," असं दानवेंनी म्हटलं.

"लोकसभेचे अध्यक्ष असताना एक मराठी बाणा मनोहर जोशी यांनी दिल्लीत दाखवून दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, वीर सावरकर यांचं तैलचित्र बसवण्यासारख्या गोष्टी मनोहर जोशी यांच्या पुढाकारानं झाल्या. मनोहर जोशी यांनी आपली एक छाप दिल्लीत सोडली," असंही अंबादास दानवेंनी सांगितलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com