Maharashtra Politics : विरोधी पक्षनेतेपदाची कोंडी फुटली; सचिवालयाच्या उत्तराने ठाकरे गटाला लॉटरी

Vidhan Sabha Opposition Leader post : राज्यात महायुतीचे सरकार आले असून सध्या विरोधकांच्या संख्येमुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद देखील मिळणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Maha Vikas Aghadi
Maha Vikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार आले आहे. सरकार सत्तेत येऊन जवळपास 3 महिने झाले आहेत. मात्र विरोधी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे विधीमंडळाचे पहिलेच अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आता मविआला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शिवसेना ठाकरे गटाला ते मिळण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या तीन नेत्यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.

राज्यात महायुतीचं सरकार आले असून अद्याप विरोधी पक्षनेतेपदाचा तिडा सुटलेला नाही. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडे एकूण जागांपैकी 10 टक्के जागे अट गाठता आलेली नाही. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता आलेला नाही. पण आता ठाकरे गटाला सचिवालयाकडून आलेल्या उत्तरामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. यामुळे मविआला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून यावर ठाकरे गटाने दावा केला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद मिळण्याची शक्यता किती आहे हे पाहण्यासाठी ठाकरे गटाने विधानसभा सचिवालयाकडे माहिती मागितली होती. शिवसेना ठाकरे गटाने 25 नोव्हेंबर 2024 ला विधीमंडळ सचिवालयाला पत्र पाठवत या संदर्भात नियमावली मागवली होती. त्याला आता सचिवालयाकडून उत्तर आले असून विरोधी पक्ष नेते पदासाठी किती सदस्य संख्या असावी असा नियमात कोणताही उल्लेख नाही. तसा कोणताही लिखित नियम नसल्याचे सचिवालयाने सांगितले आहे.

Maha Vikas Aghadi
Maha Vikas Aghadi : 'MVA' मध्ये जागा वाटपाचा 'निकष' ठरला; किती जागा कोणाच्या वाट्याला येणार, याची उत्सुकता!

तसेच संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा सांगोपांग विचार करून अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा हे आपल्या अधिकारात विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसमा यांच्या नियुक्त्या करत असतं असेही सचिवालयाने म्हटलं आहे.

Maha Vikas Aghadi
Maha Vikas Aghadi News : काँग्रेस म्हणतंय 80-85, ठाकरे गटाची वाढली काळजी!

ही नावे चर्चेत

यामुळे आता महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. सध्या भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र विरोधी पक्षनेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे आता पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com