Child Abuse Case : उपचाराच्या नावाखाली 55 वर्षांच्या नराधम भोंदू बाबाचा 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; महाराष्ट्रात पुन्हा हादरला

Palghar Fake Baba Crime Case : महाराष्ट्रात उपचाराच्या नावाखाली भोंदू बाबाने 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा धोका अधोरेखित झाला आहे.
Pune crime case 2026 child assault
Pune crime case 2026 child assaultSarkarnama
Published on
Updated on

राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने समोर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकमधील खरात प्रकरणानंतर भोंदू बाबा आणि अघोरी उपचारांच्या नावाखाली फसवणूक व अत्याचार करणाऱ्या घटनांचा पुन्हा एकदा पर्दाफाश होत आहे. अशातच पालघर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५५ वर्षांच्या एका भोंदू बाबाने अघोरी पूजेच्या नावाखाली १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी सध्या सरकारी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते.

Pune crime case 2026 child assault
Nasrapur Pune Child Rape : "बाप म्हणवून घेण्याचीही लाज वाटतेय!" नसरापूर प्रकरणातील आरोपीला स्वतःच्याच मुलाने नाकारलं; पत्नीचीही जिवंत जाळण्याची मागणी

पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीच्या त्रासामुळे रक्तस्त्राव होत होता. तिच्यावर उपचार करण्यासाठी आरोपी शिवराम परशु सावर याच्याकडे गेल्या होत्या. त्यानंतर ३ मे २०२६ रोजी आरोपी स्वतःची इको कार घेऊन आणि साक्षीदार सुरेश माहद्या सोमण याला सोबत घेऊन खताडपाडा येथे आला. तेथून त्याने फिर्यादी, पीडित मुलगी, तिचे काका यांना कारमध्ये बसवून 'गावठी औषध देतो' असे सांगत चरी पावण (ता. डहाणू, जि. पालघर) येथे आणले. ४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

या वेळी आरोपीने मुलीला, ही गोष्ट कुणालाही सांगितल्यास जीव मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली केल्या. पोलीस पथकाने अवघ्या २ तासांच्या आत आरोपी शिवराम सावर याला ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(१), ६५(१), ३५१(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४(२), ८ आणि १२ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पीडित मुलीवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Pune crime case 2026 child assault
Raj Thackeray On Nasrapur Case : 'नराधमाला हालहाल करून संपवा!'; नसरापूर प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप, म्हणाले...'

अशा घटनांमधून पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा भयानक चेहरा समोर आला आहे. आजारपणात डॉक्टरांकडे जाण्याऐवजी भोंदू बाबांच्या आश्रयाला जाणे किती महागात पडू शकते, याचे हे एक विदारक उदाहरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Nasrapur Rape case accused
Pune crime case 2026 child assault
Krishna Chandgude,Maheshgiri
Nashik Fake Baba Case | Woman Assault News
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com