Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी हसत हसत मनातील खदखद बोलून दाखवली, 'धनुभाऊला अन् मला ती खाती...'

Pankaja Munde on Animal Husbandry Environment Ministry : पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भाऊ धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत म्हटले की, आम्हा दोघांनाही अशी खाती मिळाली ज्यात फारसं बोलता येत नाही.
BJP leader Pankaja Munde addresses the media on the Animal Husbandry and Environment Ministry and comments on Dhananjay Munde.
BJP leader Pankaja Munde addresses the media on the Animal Husbandry and Environment Ministry and comments on Dhananjay Munde.sarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde News : लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हसत हसत मनातील खदखद बोलून दाखवली.

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत म्हटले की, 'आम्हा दोघांनाही अशी खाती मिळाली, ज्यात फारसं बोलता येत नाही.'

त्या म्हणाल्या, 'आमचे धनूभाऊ म्हणाले त्यांना पारितोषिक मिळाले की आणखी काय मिळालं, त्यांना समाजकल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तर पशुसंवर्धन मिळालं. ज्यांना बोलताही येत नाही. लोकांना पर्यावरण मंत्रालय समजवता समजवता माझ्या नाकी नऊ येतात.'

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'पण मुंडेसाहेबांची एक शिकवण आहे. जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे.', या संस्कारात आम्ही वाढलो आहोत.

'खाते कोणते आहे यापेक्षा त्या खात्याला आपल्या कामामुळे ओळख मिळते. भ्रष्टाचार करून घरी जाणाऱ्यांना जनता कधीच लक्षात ठेवत नाही, लोकांचे काम करणाऱ्यांनाच इतिहास लक्षात ठेवतो.' असे त्या म्हणाल्या.

राजकारणातील महिलांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी सांगितले, "आजही महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. संविधानाने समानतेचा अधिकार दिला असला, तरी स्त्री-पुरुष भेदाचे राजकारण अजूनही सुरू आहे. त्याचा अधिक त्रास मलाच सहन करावा लागतो," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

BJP leader Pankaja Munde addresses the media on the Animal Husbandry and Environment Ministry and comments on Dhananjay Munde.
Jaish-e-Mohammed Suspect : जैश संशयित हमीम मंडल प्रकरणात मोठी कारवाई; 'हनी-ट्रॅप नेटवर्क'च्या संशयावरून महिला साथीदार अटक

अंधश्रद्धेपासून दूर राहा

अण्णाभाऊ साठे उन्हात उभे राहिले म्हणून आपण आज सावलीत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावर देशाला संविधान दिले असे सांगत पंकजा मुंडे यांनी तरुणांना शिक्षण घेण्याचे, कष्ट करण्याचे आणि अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

BJP leader Pankaja Munde addresses the media on the Animal Husbandry and Environment Ministry and comments on Dhananjay Munde.
Rahul Gandhi FIR Varanasi : संसदेतील आंदोलनानंतर राहुल गांधींसह तीन खासदारांविरोधात वाराणसीत एफआयआर; सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com