Pankja Munde : पंकजा मुंडेंची प्राजक्तासाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांवर केली टीका

Pankaja Munde literary style News : प्राजक्ताने पत्रकार परिषद घेऊन धस यांच्यावर टीका केली. त्यातच आता या वादात मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन प्राजक्ता माळीची बाजू घेत आमदार सुरेश धस यांना जोरदार टोला लगावला.
Prajkata Mali, Pankja Munde, Suresh dhas
Prajkata Mali, Pankja Munde, Suresh dhas Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले असतानाच या हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आमदार सुरेश धस यांच्याकडून काही अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागले आहे. प्राजक्ताने पत्रकार परिषद घेऊन धस यांच्यावर टीका केली. त्यातच आता या वादात मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन प्राजक्ता माळीची बाजू घेत आमदार सुरेश धस यांना जोरदार टोला लगावला.

मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून प्राजक्ता माळीचे नाव न घेता साहित्यहिक भाषेत बाजू घेतली आहे. परळीचा सांस्कृतिक पॅटर्न असे म्हणत आमदार धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajkata Mali) नाव घेतल्यानंतर ह्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीनेही पत्रकार परिषद घेऊन गेल्या दीड महिन्यांपासून सोशल मीडियातून होत असलेल्या अपप्रचारामुळे आपण त्रस्त असल्याचे सांगितले. एका लोकप्रतिनिधीने माझ्या नावाचा उल्लेख केल्याने मला पत्रकार परिषद घेऊन बोलावं लागत असल्याचे सांगत तिने महिलांवर होणाऱ्या चारित्रहननच्या मुद्द्यावरुन सर्वांनाच लक्ष्य केले होते.

Prajkata Mali, Pankja Munde, Suresh dhas
Santosh Deshmukh Murder Case : 'तो' मोठा नेता कोण? नाव जाहीर करा; अपहरणासाठी वापरलेल्या वाहनातील मोबाईलवरून अंजली दमानिया आक्रमक

या प्रकारानंतर भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन प्राजक्ता माळीचे समर्थन केले. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्राजक्ता माळी यांचे कुठेही नाव घेतले नाही. पण काल पाहवलं नाही... असे म्हणत कालच्या प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवर भाष्य केले. तसेच, सर्वच महिलांना कणखर राहायला हवे, स्वत:ला कणखर बनवायला हवे, असे म्हणत साहित्यिक भाषेतून संदेश दिला आहे.

Prajkata Mali, Pankja Munde, Suresh dhas
Santosh Deshmukh Murder Case : 'वाल्मिक कराड रोज एक कोटी रुपये घेऊन जात होता', आमदाराच्या दाव्याने खळबळ

''शक्ती शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व,'' असे म्हणत पंकजा मुंडे यांनी स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवणे किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केले जात असल्याचे आपल्या ट्विटमधून सूचवले आहे.

Prajkata Mali, Pankja Munde, Suresh dhas
Santosh Desmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे सीआयडीला आदेश; फरार आरोपींची संपत्ती जप्त करा

या घटनेचा संदर्भ बोलताना प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ साहित्यिक शब्दात पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले, असे म्हटले आहे. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजच्या समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all #women असे म्हणत पंकजा मुंडेनी प्राजक्ता माळीला धीर देण्याचं काम केले आहे. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Prajkata Mali, Pankja Munde, Suresh dhas
Anjali Damania : संतोष देशमुख हत्येप्रकरणी केलेलं 'ते' वक्तव्य अंजली दमानियांना भोवणार? बीड पोलिसांनी धाडली नोटीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com