

Nashik News : नाशिक महापालिकेमधील उद्धव ठाकरे यांच्या नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा रंगली असतानाच त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दक्षता घेतली जात आहे. नाशिकमधील ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 15 नगरसेवकांची बैठक बुधवारी दुपारी मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीला सर्वच नगरसेवक उपस्थित होते. एकही नगरसेवक गैरहजर नव्हता. त्यामुळे ऑपरेशन टायगर राबविणार असल्याची घोषणा ही अफवाच ठरली आहे. यावेळी ठाकरे यांच्या नगरसेवकांनी आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. येत्या काळातही हे सर्व नगरसेवक कायम उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहेत, आम्ही कधीच त्यांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना नगरसेवकांनी स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी नाशिक महापालिकेतील सर्व नगरसेवकांची मातोश्रीवर तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व नागरसेवकानी हजेरी लावली. मातोश्रीवर यापूर्वी राज्यातील खासदारांची बैठक झाली. त्यांनतर आमदारांची ही बैठक पार पडली. त्यानंतर काही खासदार फुटले. परंतु आमचे नाशिकचे खासदार फुटले नाहीत. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगतो मातोश्रीवर नगरसेवकांची बैठक झाली. परंतु आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही. या बैठकीला सर्व 15 नगरसेवक उपस्थित होते, एकही नगरसेवक गैरहजर नव्हता.
एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेच्या नेत्याकडून अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांनी आमच्या पाच ते सहा नगरसेवकांशी संपर्क साधला. प्रत्येकाला प्रभाग निधी म्हणून 5 कोटी रुपयांचा निधी देतो, असे सांगितले होते. त्यानंतर काही त्यांनी वेगळं आमिष दिलं असेल तर ते माहिती नाही, परंतु आमचे सर्व नगरसेवक हे कायम उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहेत, अशी भूमिका यावेळी या नगरसेवकांनी स्पष्ट केली.
नुकतीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे, तब्बल सहा खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर देखील एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडून ऑपरेशन टायगर सुरूच राहणार आहे, अशा पद्धतीचा दावा करण्यात येते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमधील उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे दहा ते बारा नगरसेवक हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली होती.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेत्याकडून पाच ते सहा नगरसेवकांना 5 कोटी रुपयांच्या निधीची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट या नगरसेवकांच्या वतीने करण्यात आला आहे, परंतु एकही नगरसेवकाने शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, सर्व नगरसेवक हे आजच्या बैठकीला उपस्थित होते. त्याचवेळी आमचे सर्व नगरसेवक हे कायम उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहेत, अशी भूमिका यावेळी या नगरसेवकांनी स्पष्ट केली. त्यामुळे यावेळी आता ऑपरेशन टायगर फसल्याची चर्चा रंगली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.