
Mumbai News : महायुती सरकारने हिंदी सक्तीचा आदेश काढताच राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्याविरोधात शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात आवाज उठवत मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र राज्य सरकारने दोन्ही निर्णय रद्द केले. तसेच नियोजित मोर्चा ऐवजी आज विजयी मेळावा घेतला. पण हा मेळावा आणि सरकारचा निर्णय उत्तर भारतीय नेत्यांना पचणी पडलेला दिसत नाही. यावरून स्वीमी आनंद स्वरुप यांनी ठाकरे बंधुंना ओपन चॅलेंज दिले असतानाच आता दुसऱ्या एका नेत्याने देखील थेट राज ठाकरेंना ओपन चॅलेंज दिले आहे. यामुळे पुन्हा राज्यात मराठी विरूद्ध उत्तर भारतीय असा नवा सामना रंगू शकतो.
राज ठाकरे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवताना हिंदी सक्ती कशा आणि कोणासाठी करायची असा सवाल केला. तर यांना आधी मुंबई स्वातंत्र्य करता येते का? हे पाहण्यासाठी हिंदी लादण्याचा प्लॅन होता. पण महाराष्ट्र शांत राहिला नाही, आणि यांना उपरती सुचली. पण आता कोणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवाच. आम्ही शांत आहोत म्हणजे याचा अर्थ गां** नाही, हे ही समजून घ्यावे. कोणी जास्तच माज करत असेल तर नक्कीच त्या हिंदीवाल्याच्या कानाखाली आवाज काढा असाही आदेश राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
यामुळे आता उत्तर भारतीय नेत्यांचा तिळपापट होताना दिसत असून स्वीमी आनंद स्वरुप यांनी व्हिडिओ करत ठाकरे बंधुंना डिवचले आहे. राज-उद्धव ठाकरे यांची औकात नाही. मी मुंबईला येतोय आणि हिंदीतून बोलणार तुमच्यात हिंमत असेल तर आडवून दाखवला, गरीब मजूरांना हात लावता. मला हात लावला तर तो हात जागेवर राहणार नाही. उखडून फेकून देऊ, असं चॅलेंज दिले आहे. यामुळे मुंबईत आधीच संताप उसळला आहे.
अशातच बिहारच्या जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका करताना परप्रातींयाबाबत घेतलेली भूमिका अनादरपूर्ण असल्याचे म्हटलं आहे. तसेच मुंबईत येऊन राज ठाकरेंना चांगलाच धडा शिकवू असेही म्हटले आहे. पप्पू यादव यांनी, मराठीच्या मुद्यावर मनसे कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदर येथे केलेल्या एका व्यापाऱ्याला मारहाणीवरून नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांच्या जीवावर मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे अशा पद्धतीने पोकळ धमक्या आणि अहंकाराने त्यांचा अपमान करू शकत नाहीत. मुंबईत येऊन त्यांना त्यांची औकात दाखवू, त्यांना चांगलाच धडा शिकवू, असाही इशारा पप्पू यादव यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.