NCP Politics: महापालिका निवडणुकीतील अपयश झोंबलं, अजितदादा आता 'ZP' ला 'ती' मोठी चूक टाळणार? शरद पवारांची राष्ट्रवादी आपला हट्ट सोडणार?

Ajit Pawar And Sharad Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकांमधील अपयश पाठीमागे टाकत आता जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर अजितदादांनी आता आपलं झेडपीसाठीचं सर्व प्लॅनिंगच बदलल्याची चर्चा आहे.
Ajit Pawar and Sharad Pawar’s NCP
Ajit Pawar and Sharad Pawar’s NCP Sarkarnama
Published on
Updated on

NCP News: राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आजपर्यंतच्या इतिहासात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये कायमच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. पण यंदा राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर ही पहिलीच ZP निवडणूक असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा कस लागणार आहे. त्यातही महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही म्हणावा तितका फायदा ना अजितदादांना झाला ना शरद पवारांना झाला. यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकांमधील अपयश पाठीमागे टाकत आता जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर अजितदादांनी आता आपलं झेडपीसाठीचं सर्व प्लॅनिंगच बदलल्याची चर्चा आहे. त्यांनी तडफाफडकी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार,खासदार यांच्यासोबत चर्चा झाली आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील एकत्रिकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या (NCP) एकत्र लढण्याबाबत अजित पवारांनी सध्याजरी थेट विधान केलेलं नसलं तरी बारामतीतील शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी आम्ही सर्व पवार कुटुंब म्हणून एक आहोत असं सूचक वक्तव्य केलं होतं. तसेच त्याचदिवशी संध्याकाळी सोलापूर जिल्ह्याचे खासदार आणि आमदार अजित पवारांना भेटायला आल्यामुळे राजकारण पुन्हा एकदा फिरण्याची शक्यता आहे.

पण याचदरम्यान, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर दोन्ही बाजूच्या नेतेमंडळीची जागावाटपाबाबत बैठकही झाली होती. पण ती चर्चा फिस्कटल्याचं समोर आलं होतं. या बैठकीत पवारांच्या पक्षाला अजितदादांकडून घड्याळ चिन्हावर लढण्याची अट घालण्यात आल्याचं बोललं गेलं. हेही एक प्रमुख कारण युती फिस्कटल्यामागं होतं.

Ajit Pawar and Sharad Pawar’s NCP
Mahayuti Politics : नगरपालिकेत भांडलेल्या निलेश अन् नितेशमध्ये नारायण राणेंची मध्यस्थी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला

त्यानंतर शरद पवारांचे नेतेमंडळी महाविकास आघाडीच्या बैठकीलाही उपस्थित राहिले होते. यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआसह लढणार अशीही माहिती समोर आली होती. पण पडद्यामागं बरीच सूत्रे फिरवली गेली अन् अचानक दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्रच जाहीरनामा प्रसिध्द झाला. त्या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे,अमोल कोल्हे,आमदार रोहित पवार या उपस्थित राहिले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण घड्याळ आणि तुतारी चिन्हावर लढले.

अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात महायुतीमध्ये असूनही ठरलेले नियम मोडत थेट भाजपला अंगावर घेतल्याचं दिसून आलं होतं. पिंपरीत भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे तर पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात राजकीय सामना रंगला होता. प्रचाराचा जोर पाहता अजितदादा पुणे पिंपरीत भाजपला धक्का देणार अशी चर्चा जोर धरू लागली होती. पण निवडणुकांच्या निकालात भाजपनं दोन्ही महापालिकांमध्ये एकहाती बहुमत मिळवल्यामुळे अजितदादांचं सत्तेचं स्वप्नं भंगलं.

Ajit Pawar and Sharad Pawar’s NCP
NCP Symbol Dispute : राष्ट्रवादीचं 'घड्याळ' कुणाचं? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच 'तडजोडी'ची चर्चा; शरद पवार, अजितदादा एकत्र येणार?

अजित पवार असो वा शरद पवार त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमधील अपयशामागं मतदारांमध्ये काही प्रमाणात नेमकं घड्याळ चालवायचं की तुतारी हा घोळ शेवटपर्यंत कायम राहिल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार दोन वेगवेगळ्या चिन्हावर लढल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे हा विश्वास मतदारांमध्ये रुजविण्यास मोठी अडचण झाली अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकाच चिन्हावर दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार लढले असते तर कदाचित निकाल मोठ्या प्रमाणात वेगळा लागलेला पाहायला मिळाला असता असा कयास अजितदादांनी बांधल्याची चर्चा आहे.

पण अजित पवार हे आता महापालिका निवडणुकीत झालेली चूक सुधारणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावर लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर सूचक विधान केलं आहे. त्यांनी निवडणुका म्हटलं की, हार जीत होत असतेच.आम्ही या निकालानंतर आत्मचिंतन करू. जो कौल पुणे आणि पिंपरी चिंचवडकर यांनी दिला आहे, तो कौल आम्ही स्वीकारला असं म्हटलं आहे.

Ajit Pawar and Sharad Pawar’s NCP
NCP Unity Talks : महापालिका निवडणुकीत 'पानिपत', आता जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

तसेच आता झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर एकमत झाल्याची माहितीही रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला होता.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा पराभव झाल्याने दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याचं दिसून आलं आहे. मागच्या पंचवार्षिकच्या तुलनेत अजित पवारांना मोठं अपयश पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीमध्ये आल्याचं दिसून आलं. याच निकालावर भाष्य करत रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याचमुळे अजितदादा महापालिका निवडणुकीतील चूक झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत सुधारणार असल्याचे संकेत दिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com