Sanjay Raut : मुंडेंच्या मतदारसंघातील व्हिडिओ शेअर; राऊत म्हणाले, 'पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये सुद्धा...'

Sanjay Raut video social media voter Dhananjay Munde Parli constituency : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेवर आक्षेप व्यक्त करणारा व्हिडिओ संजय राऊतांनी समाज माध्यमांवर शेअर करत खळबळ उडवून दिली.
Sanjay Raut 1
Sanjay Raut 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणूक राज्यात गाजली. राज्यात कुठेही ईव्हीएम मशीन फोडले गेले नाही. पण इथं हा प्रकार झाला. या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत झाली.

या परळी विधानसभा मतदारसंघात मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोचू दिल्याचा नसल्याचा दावा करणारा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली.

संजय राऊत यांनी शेअर केलेला व्हिडिओ 1 मिनिट 35 सेकंदाचा आहे. या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले काही स्थानिक पुढारी, छोटे-मोठे कार्यकर्ते दिसत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा देखील ऐकायला मिळते. पुढे हा व्हिडिओ पाहिल्यावर हाणामारी देखील झाल्याचे दिसते. तरुण-युवक धावतांना दिसतात. हाच धागा पकडत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीविषयी मोठा दावा केला आहे.

Sanjay Raut 1
Manoj Jarange Patil : आरक्षणासाठी तुटून पडा, निवडून आलेल्या आमदारांशी भांडा ; सरकार स्थापनेनंतर सामूहिक उपोषण करणार!

"लोकशाहीतील विचलित करणारे हे दृश्य आहे परळी मतदार संघातील. अशा प्रकारच्या निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये सुद्धा होत नसतील. मतदाराना केंद्रावर येऊच दिले नाही. दहशत पळवून लावले. निवडणूक आयोग जिवंत आहे काय?", असा प्रश्न करत संजय राऊत यांनी हा व्हिडिओ निवडणूक आयोग, भाजप (BJP) नेते केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केला आहे.

Sanjay Raut 1
Karjat Jamkhed Assembly Election : निकाल काय लागणार? 'या' तणावात दोघांचे 'हार्ट फेल'

परळी विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी मुंडे आणि देशमुख यांचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे आरोप झाले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे स्थानिक नेते माधव जाधव यांना मारहाण झाली. त्याचे पडसाद घाटनांदूर इथल्या बँक काॅलनी परिसरातील मतदान केंद्रावर उमटले. तिथं काहींनी केंद्रात घुसून ईव्हीएम मशीन फोडले. यामुळे शहरातील तणावाचे वातावरण होते. राजासाहेब देशमुख यांनी हा प्रकार धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला. तसेच २२ मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची मागणी केली.

याशिवाय राजसाहेब देशमुख यांनी पोलिस, महसूल, प्रशासन त्यांच्यासोबत आहे. शहरात अराजकता वाढली असून, लोक भयभीत आहेत. सत्तेचा वापर करून सर्वसामान्य लोकांना उद्धवस्त करण्याचे काम झाले. आमच्या सोबत माणूस आला नाही पाहिजे, याची सर्व खबरदारी घेतली गेली होती. बिहार सुद्धा लाजेल, अशी गुंडगिरी सुरु आहे, अशी टीका देखील केली होती. यात संजय राऊत यांनी मतदान केंद्रावर मतदाराला जाऊ दिले नसल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना 1 लाख 93 हजार 355 मते मिळाली. शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना 54 हजार 146 मते मिळाली. इथं एकतर्फा निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com