Bribe
Bribe Sarkarnama

अबब...! तब्बल १ कोटींच्या लाचेची मागणी : माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंरक्षकावर गुन्हा दाखल

Crime News | Pune | Kolhapur : एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही भेटा...
Published on

कोल्हापूर : शेतजमिनीच्या दाव्याचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, असे म्हणून तब्बल एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षक असलेल्या पोलिस नाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जॉन वसंत तिवडे (रा. कोरोची, हातकणंगले) असे त्या संशयिताचे नाव आहे. (Crime News | Pune Crime latest News)

लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे देहूगांव (ता. हवेली, पुणे) येथील शेतीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे खंडपीठ येथे तीन दावे सुरू होते. दरम्यानच्या काळात त्यांच्याशी एका अनोळखीने फोनवरून संपर्क साधला. त्यांने एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही भेटा असे सांगितले. तक्रारदार त्याच्या संपर्कात होते. तक्रारदार यांनी २५ फेब्रुवारी २०२२ रोजी संबधिताची कोल्हापुरात भेट घेतली.

त्यावेळी तो पोलिसी वर्दीतील येऊन त्यांना भेटला. त्याने दाव्याचा निकाल संदर्भात तक्रारदार यांना ‘तुमच्या विरूद्ध पार्टीने आम्हाला एक कोटीची ऑफर दिली आहे. तुम्ही किती देता ते बोला.’ तसेच ‘केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही किती रुपये देवू शकता? समोरच्या पार्टीने एक कोटीची ऑफर दिली आहे. असे सांगून लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. (Crime News | Pune Crime latest News)

विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये २२ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयातील संशयित पोलिस नाईक तिवडे याने एका हॉटेलमध्ये तक्रारदारांची भेट घेतली. त्याच्याकडे त्याने जमिनीबाबत एमआरटी कौसिल पुणे येथील दाव्यांचे निकाल येथील प्रशासकीय सदस्य साहेबांना सांगून तुमच्या बाजूने लावून देण्यासाठी विरुद्ध पार्टीने एक कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. तक्रारदारांना घरच्यांशी चर्चा करून विरुद्ध पार्टीच्या ऑफरप्रमाणे करा असे म्हणून लाचेची मागणी केल्याचे पुढे आले.

त्यानुसार संशयित पोलिस नाईक तिवडेंवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयिताची नेमणूक पोलिस मुख्यालयात असून त्याचा शोध सुरू असल्याचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले. कारवाई पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनानुसार उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत, अमंलदार विकास माने, सुनल घोसाळकर, मयुर देसाई, रुपेश माने आदींनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com