Satara News : सामाजिक वनीकरणात १०७ कोटींचा घोटाळा; अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आर. आर. प्रतिष्ठानचे 'हलगी नाद' आंदोलन

Dadasaheb Chavan शासनाने वृक्ष लागवडीसाठी दिलेला निधी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने स्वतःच्या खिशात टाकल्याचा आरोपही उपोषणकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केला आहे.
R.R. Lokvikas Pratisthans Andolan
R.R. Lokvikas Pratisthans Andolansarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड न करता बोगस कागदपत्रे तयार करून १०७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आहे. त्यामुळे सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानने केली आहे. त्यासाठी गेले सात दिवसांपासून सामाजिक वनीकरण कार्यालयाबाहेर 'हलगी नाद' आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत आर. आर. पाटील R.R. Patil Pratistan लोकविकास प्रतिष्ठानचे उपोषणकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी सांगितले, की जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड न करता बोगस कागदपत्रे तयार करून सुमारे १०७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा तत्कालीन व विद्यमान विभागीय वन अधिकाऱ्यांनी Forest Officer केला आहे.

सर्व तालुक्यांतील वनक्षेत्रपाल व वनपाल यांचीही त्यांना साथ मिळाली आहे. याप्रकरणी वरिष्ठ समिती स्थापन करून सर्व दोषी वन अधिकाऱ्यांवर वन विभागाच्या व शासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष लागवडीसाठी ७१ कोटी ४४ लाख १९ हजार ५३२ रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या वतीने लिपिक एस. व्ही. कदम यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाली आहे. यामध्‍ये निर्देशित केलेल्या निधी वाटपाच्या तुलनेत प्रत्यक्ष काम झाले नसल्याचा दावा श्री. चव्‍हाण यांनी केला आहे.

R.R. Lokvikas Pratisthans Andolan
Satara Maratha Reservation : कुणबी शब्दाची लाज वाटते; शेती विकून चंद्रावर जावा...जरांगे पाटलांचा सल्ला

शासनाने वृक्ष लागवडीसाठी दिलेला निधी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने स्वतःच्या खिशात टाकल्याचा आरोपही करण्यात आला. याबाबत जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन, उपोषण सुरूच राहील, असेही श्री. चव्‍हाण यांनी सांगितले. यावेळी लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण, सदाशिव पाटील, सौदागर मोरे, सुनील विभूते, अशोक नागणे, गजेंद्र कांबळे, विजय डावरे, विकास कांबळे, युवराज श्रीखंडे उपस्थित होते. Maharashtra Political News

लोकविकास प्रतिष्‍ठानतर्फे केले गेलेले आरोप मी कार्यभार स्वीकारण्यापूर्वीचे आहेत. कोणताही पुरावा किंवा दस्तऐवज सादर न करता मोघम स्वरूपात आहेत. त्‍यात तथ्य नाही. सहायक वन अधिकारी श्री. लंगडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागेल. यामध्‍ये कोणी दोषी आढळल्यास निश्चित कार्यवाही करण्यात येईल.

- हरिश्‍चंद्र वाघमोडे ( विभागीय वन अधिकारी, सातारा)

Edited By : Umesh Bambare

R.R. Lokvikas Pratisthans Andolan
Pune News : कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना शोधण्यासाठी पुण्यात पोलिसांची धावपळ; नेमकं काय झालं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com