Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचा नवा व्हिडीओ व्हायरल, जेवणाच्या ताटातलं अन्नही धड खाता येईना !

Ashok Kharat Viral Video : अशोक खरात सध्या जेलमध्ये आहे. या हायप्रोफाईल खटल्यात आता राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
Ashok Kharat Viral Video
Ashok Kharat Viral VideoSarkaranma
Published on
Updated on

Ashok Kharat : आपल्याकडील कथित शक्तीच्या नावाखाली शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात सध्या जेलमध्ये असलेला नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये अशोक खरात मद्याच्या प्रभावाखाली असल्याचे दिसून येते. नशेचे प्रमाण इतके असल्याचे दिसते की त्याला स्वतःच्या हालचालींवरही नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. व्हिडिओत खरात जेवणासाठी टेबलासमोर बसलेला आहे. मात्र, समोर वाढलेले अन्नही त्याला व्यवस्थित खाता येत नसल्याचे दृश्य त्यात पाहायला मिळते.

आपल्या हातात अन्नाचा घास आहे आणि तो तोंडात टाकायचा आहे, याचेही भान अशोक खरातला राहिलेले दिसत नाही. अशोक खरातचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भक्तांना अध्यात्म आणि शुद्ध आचरणाचे ढोंग शिकवणाऱ्या या भोंदू खरातचा हा खरा आणि ओंगळवाणा चेहरा समोर आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Ashok Kharat Viral Video
Ashok Kharat Crime: अशोक खरातचे केबिनमधील व्हिडीओ 21 राज्यांसह परदेशापर्यंत पोहोचले, क्लिप विक्रीचं रॅकेट? तपासात धक्कादायक खुलासा

उज्वल निकमांची एण्ट्री

खरातविरोधात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक, 'महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा' अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्य शासनाने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तपासात, खरातकडून महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे तब्बल 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांना मिळून आल्याचे सांगितले जात आहे. खरातचे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे ऑफिस होते. याच ऑफिसमधील त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यातूनच हे प्रकरण चर्चेत आलं होतं.

Ashok Kharat Viral Video
Ashok Kharat Case: राज्य हादरवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; CM फडणवीसांच्या एका निर्णयामुळे राजकीय नेते, अधिकाऱ्यांना भरणार धडकी

चाकणकरांनी पाठवल्या नोटीसा

खरात सोबत असलेल्या कथित जवळच्या संबंधांमुळे राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासह राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर दरम्यान एसआयटी पथकाने त्यांनाही नाशिक येथे चौकशीसाठी बोलावले होते.

दरम्यान आता, कोणताही पुरावा नसताना करण्यात आलेल्या आरोपांविरोधात आता कायद्याच्या चौकटीत लढा देणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. चाकणकर यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या काही महिलांना खोर्टात खेचलं असून दिल्ली उच्च न्यायालयातून नोटीसा धाडल्याची माहिती नुकतीच दिली. पुरावा नसताना चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात ही लढाई असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com