Pandharpur Corridor : मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’च्या विरोधात पंढरपुरातील 458 व्यापाऱ्यांचे मतदान

CM Fadnavis' Dream Project : सरकारी आणि राजकीय पातळीवरही पंढरपुरातील व्यापाऱ्यांना समजावून सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे व्यापाऱ्यांची बाजू समजून घेऊन त्यांचे प्रबोधन करत आहेत. मात्र, अजूनही पंढरपूर कॉरिडॉरला अजूनही विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.
Pandharpur Corridor Voting
Pandharpur Corridor VotingSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 June : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेला ‘पंढरपूर कॉरिडाॅर’ पूर्ण करण्यासाठी सरकारी पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पंढरपुरातील मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांकडून त्याला विरोध केला जात आहे. पंढरपूर कॉरिडॉर विरोधी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने शनिवारी (ता. १४ जून) अभिरूप मतदान घेण्यात आले. त्या मतदानात मंदिर परिसरातील बाधित तब्बल 458 व्यापाऱ्यांनी कॉरिडॉरच्या विरोधात मतदान केले असून केवळ 15 मालमत्ताधारकांनी कॉरिडाॅरच्या बाजूने मतदान केले आहे.

पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंढरपूर कॉरिडॉर घोषित केला आहे. या कॉरिडॉरच्या आराखड्यानुसार पंढरपूर शहरातील रस्ते, प्रदर्शना मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार,अद्ययावत वाढीव वाहनतळे, दर्शन मंडप, स्कायवॉकची उभारणी, घाट बांधणी, उद्यानांचा विकास, हेलिपॅडची उभारणी, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, भूमिगत गटार योजना भूमिगत विद्युतीकरण, स्नानगृहे, शौचालयांची उभारणी, चेंजिंग रूम, वारकरी निवारा केंद्र, अग्निशामन केंद्र, रेडिओ केंद्र, ट्रामा केअर सेंटर, संतीपीठ, पालखीतळ विकास, 65 एकर परिसराचा विकास आदी कामांचा यामध्ये समावेश आहे.

तसेच, मंदिर परिसरात दर्शन व्यवस्था, भजन-कीर्तन हॉल, दोन मजली शॉपिंग सेंटर, बहुउद्देशीय हॉल, संत साहित्य ग्रंथालय, प्रशासकीय इमारत, वाहनतळ आदी कामे प्रस्तावित आहेत. मात्र, या पंढरपूर कॉरिडॉरमुळे (Pandharpur Corridor) मंदिर परिसरातील निवासी मालमत्ता, दुकाने, ऐतिहासिक मठ बाधित होणार आहेत, त्यासाठी सरकारकडून भरपाईसाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, पंढरपुरातील मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांकडून कॉरिडॉरला विरोध करण्यात येत आहे.

सरकारी आणि राजकीय पातळीवरही पंढरपुरातील व्यापाऱ्यांना समजावून सांगण्यात येत आहे. मात्र, मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांकडून काॅरिडाॅरला विरोध करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे व्यापाऱ्यांची बाजू समजून घेऊन त्यांचे प्रबोधन करत आहेत. मात्र, अजूनही पंढरपूर कॉरिडॉरला अजूनही विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.

Pandharpur Corridor Voting
Satara Politic's : शिवेंद्रराजेंच्या साताऱ्याचे वजन ‘झेडपी’त घटणार; तर फलटण, खटाव, कोरेगावचे वाढणार

कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून कॉरिडॉरला विरोध करण्यात येत आहे. या समितीने शनिवारी (ता. १४ जून) सकाळी पंढरपुरात मंदिर परिसरातील बाधित व्यापाऱ्यांसाठी अभिरुप मतदानाचे आयोजन केले होते.

Pandharpur Corridor Voting
Zillha Parishad Election : मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यातील जिल्हा परिषदेचे दोन सदस्य घटले; उत्तर सोलापूर अन्‌ करमाळ्याचे राजकीय वजन वाढले

या अभिरूप मतदानात मंदिर परिसरातील तब्बल 458 मालमत्ता धारकांनी कॉरिडॉरच्या विरोधात मतदान केले आहे, तर केवळ 15 मालमत्ताधारकांनी कॉरिडॉरच्या बाजूने मतदान केले आहे. नऊ मालमत्ताधारकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. तीन मते बाद झाली आहेत. अभिररूप मतदानाची आकडेवारी राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे, असे कॉरिडॉर विरोधी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com