Solapur Lok Sabha 2024 : सोलापुरात घटला मतदानाचा टक्का; 2019 मध्ये 58.45 तर यंदा 57.46 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 60.16 टक्के झाले आहे.
Ram Satpute-Praniti shinde
Ram Satpute-Praniti shindeSarkarnama

Solapur, 07 May : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज चुरशीने 57.46 टक्के मतदान झाले आहे. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये 58.45 टक्के मतदान झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास एक टक्के मतदान घटल्याचे दिसून येत आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कोणला बसणार, याची चर्चा आता रंगली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 60.16 टक्के झाले आहे, त्यापाठोपाठ भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर-मंगळेवढा विधानसभा मतदारसंघात 58.09% मतदान झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute-Praniti shinde
Solapur Lok Sabha : सोलापुरात आमदार राम सातपुते अन्‌ काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

सोलापूर (Solapur) शहर उत्तर मतदार संघात 56.81 टक्के, तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात 56.32% एवढे मतदान झाले आहे. हा मतदारसंघ हा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा आहे. सोलापूर शहर उत्तर मतदार संघ हा माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट मतदार संघात 55.31% मतदान झाले आहे, तर माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर या मतदारसंघात 58.21% एवढे मतदान झाले आहे. आता यातील कोणत्या मतदारसंघाने कोणाला हात दिला, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.

Ram Satpute-Praniti shinde
Lok Sabha Election 2024 : माढा-सोलापूरमध्ये लोकशाहीचा उत्सव

उन्हाचा संभाव्य तडाका लक्षात घेता सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. दुपारच्या उन्हामुळे ही गर्दी काहीशी मंदावली होती. मात्र, दुपारी चारनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या पुन्हा रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत लागलेल्या रांगामुळेच मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे. कारण, सायंकाळी पाचपर्यंत सोलापूर मतदारसंघात 49.85% एवढे मतदान झाले होते, सायंकाळी पाचनंतर सहापर्यंत म्हणजे एक तासाच्या मतदानात तब्बल साडेसात टक्के मतदान झाल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात जोरदार लढाई झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी चुरशीने मतदान झाले. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले.

Ram Satpute-Praniti shinde
Karmala Voting : धक्कादायक...करमाळ्यात 200 पेक्षा जास्त जिवंत मतदारांना दाखवले मृत; मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com