Shalarth ID Scam : हॉस्पिटलमध्ये भाजप नेता, बाहेर न्यायालयाचा दणका ; 160 कोटींच्या घोटाळ्यात 15 जणांचे जामीन फेटाळले

Sanjay Garud,Nashik Shalarth Scam : नाशिकमधील १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित १५ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Sanjay Garud, Shalarth ID Scam
Sanjay Garud, Shalarth ID ScamSarkarnama
Published on
Updated on

Shalarth ID Scam : राज्यभर गाजत असलेल्या नाशिकमधील १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणात नाशिकरोड न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि. ७) या प्रकरणाशी संबंधित १५ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले. न्यायालयाच्या या निर्णयाने बड्या अधिकाऱ्यांसह संस्थाचालक व मुख्यध्यापकांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

दरम्यान, याप्रकरणात शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भाजप नेते संजय गरुड यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मुक्काम कायम आहे. गरुड यांना अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. ते आजूनही सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या शालार्थ आयडी घोटाळ्यात आपला हात असलेल्या बड्या राजकीय नेत्यांची नावे उघड होऊ नयेत म्हणून गरुड यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्याची धडपड सुरु असल्याची चर्चा आहे.

बनावट शालार्थ आयडी तयार करुन शासनाची तब्बल १६० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून पात्रता नसलेल्या व्यक्तींना शिक्षक व शिक्षकेतर पदांवर नियुक्त करून त्यांना शासनाच्या वेतन प्रणालीत समाविष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रक्रियेत मोठ्या आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण झाली आहे.

या प्रकरणी मार्च २०२६ मध्ये नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल असून, या प्रकरणी SITने सुमारे ११ हजार पानांचे दोषारोपपत्र नाशिक रोड न्यायालयात सादर केले. सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याचा तपास वेगात सुरू आहे.

Sanjay Garud, Shalarth ID Scam
Shalarth ID Scam : अटकेतील भाजप नेत्याला हॉस्पिटलमध्येच ठेवण्याची धडपड : 160 कोटींच्या घोटाळ्याचं चौकशीत बिंग फुटण्याची भीती

तर, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले गुन्ह्यातील संशयित व निवृत्त तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनीही जामिनासाठी नाशिक रोड न्यायालयात धाव घेतली. त्यावर मंगळवारी( दि.११) सुनावणी आहे.

संबंधित गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी १४ जामीन अर्जांवर शुक्रवारी नाशिक रोड न्यायालयात सुनावणी पार पडली. संशयित भाऊसाहेब चव्हाण, मीनाक्षी गिरी, प्रदीप शिंगणे, अतुल पवार, राहुल पवार, उमेश पवार, मनीष कदम, किरण कुवर, प्रवीण अहिरे, भास्कर पाटील, देवीदास महाजन, अनिवाश पाटील, मनोज पाटील, शरद शिंदे यांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले. यामुळे या संशयितांवर अटकेची टांगती तलवार आहे.

Sanjay Garud, Shalarth ID Scam
Shalarth ID Scam : 160 कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड गजाआड ! कसं चालायचं रॅकेट? शाळा कशा हेरायचा? मोडस ऑपरेंडी उघड

SIT पथकाने कसून तपास सुरु केला असून या प्रकरणाशी संबंधितांविरोधात फास आवळायला सुरुवात केली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे व जळगाव जिल्ह्यातील शिक्षण संस्था रडारवर आहेत. SIT ची पथके या जिल्ह्यात तपासकामी दाखल झालेली आहेत. गुन्हे शाखेकडून शेंदुर्णी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. या गुन्ह्यात उत्तर महाराष्ट्रातील २३३ शाळांमधील ८२१ शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, सचिव आणि शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह तब्बल एक हजार १९९ संशयित निष्पन्न झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com