Kolhapur Ganpati Visarjan: मानाच्या तालमीने फलकाच्या माध्यमातून राजकीय नेत्यांना झापलं; मिरवणुकीतील फलक ठरले लक्षवेधी

Kolhapur Politics: कोल्हापुरातील राज्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना गणेश विसर्जन मिरवणुकीतून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
Kolhapur Ganpati Visarjan
Kolhapur Ganpati VisarjanSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर :

Kolhapur News : कोल्हापूरमधील गणेश विसर्जन मिरवणूक राज्यात चर्चेचा विषय ठरते. मात्र, यंदा मानाच्या तालमीनेच कोल्हापुरातील राज्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना गणेश विसर्जन मिरवणुकीतून सवाल उपस्थित केले आहेत.

कोल्हापूरच्या विकासकामांसंदर्भात आणि हद्दवाढीवरून अनेक फलक या मिरवणुकीत झळकवण्यात आले आहेत. हे फलक सध्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजल घालणारे आहेत. झळकवण्यात आलेले फलक छोटे असले तरी त्यावरील शब्दांची तीव्रता अन् कोल्हापूरची अवस्था स्पष्ट करणारे आहेत.

Kolhapur Ganpati Visarjan
Ghodganga Sugar Factory : घोडगंगा कारखाना शिरूरकरांसाठी देव, तो जगाला पाहिजे; शेतकरी संघटनेला चिंता

कोल्हापुरातील मानाची आणि सर्वप्रथम निघणारे श्री तुकाराम माळी तालमीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदाचे फलक लक्षवेधी ठरत आहेत. कोल्हापूर शहर सध्या कोणत्या अवस्थेतून जात आहे, याची वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतील कोल्हापूर आणि सध्या कोल्हापूरची असणारी परिस्थिती, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे या फलकाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.

मानाच्या तालमीने कोणते प्रश्न विचारले ?

  • चंद्रावर यान गेलं, पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय ?

  • काय ती वाहतूक कोंडी ?

  • काय ती शहराची हद्द वाढ ?

  • काय तीर्थक्षेत्र आखाडा ?

  • काय ते रस्ते ?

  • काय ती थेट पाईपलाईन ?

  • काय ती पवित्र पंचगंगा नदी ?

    Edited By- Ganesh Thombare

Kolhapur Ganpati Visarjan
Ganesh Visarjan 2023 : खड्ड्यांमध्ये गुलाल उधळत, पूजा करीत मनसेकडून बाप्पाला निरोप; महापालिका आयुक्तांना सद्बुद्धी दे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com