Gokul Election : 'सतेज पाटलांनी काय करावे ते त्यांनी ठरवावं, महायुतीच्या जागावाटप मुख्यमंत्री ठरवतील', मंत्री मुश्रीफांनी गोकुळचा विषय संपवला

Hasan Mushrif Vs Satej Patil : मुश्रीफ यांनी महायुती महायुती हे शब्द 12 हजार वेळा उच्चारल्याची टीका काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केली होती. यावरून हसन मुश्रीफ यांनी थेट उत्तर देत आमचं ठरलं असे म्हटलं आहे.
Gokul Dudh Sangh : Satej Patil-Hasan Mushrif
Gokul Dudh Sangh : Satej Patil-Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : सतेज पाटील यांनी काय करावं? हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही युती म्हणून काय करावं? हा आमचा प्रश्न आहे. आमचं ठरलेलं आहे की गोकुळची निवडणूक लढवणार आणि जिंकणं आणि महायुतीचा चेअरमन करणे हे फायनल आहे. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही. तोपर्यंत जागावाटप होणार नाही. मतदार यादी फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर हा पेच सुटेल. पण सध्यातरी जागांचा फॉर्मुला ठरलेला नाही, असे विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या जागावाटपाच्या प्रश्नावर बोलत होते.

गोकुळची कच्ची यादी आणि पक्की यादी असा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आता कच्च्या आणि पक्क्या याद्यांचा संस्थांकडून ठराव जाणे. संस्थांनी त्यांच्या व्यक्तीचा ठराव करून पाठवणे हा पहिला टप्पा आहे.

आता दुसरा टप्पा आहे. तो कच्ची आणि पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर सेपरेट ठराव करून पाठवणे. त्यानंतर या दोन्ही याद्या पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल. ही निवडणूक सप्टेंबर महिन्यात लागण्याचा अंदाज असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Gokul Dudh Sangh : Satej Patil-Hasan Mushrif
Gokul Election : अखेर मुख्यमंत्र्यांनी गोकुळचा कंडका पाडला! सगळं ठरलं, भाजपच होणार मोठा भाऊ, चौकशाही गुंडाळणार?

आम्ही महायुती म्हणूनच लढणार हे सातत्याने यापूर्वी सुद्धा जाहीर केलेला आहे. आमचे मित्र सतेज पाटील म्हणाले 12 हजार वेळा मुश्रीफ यांनी महायुती महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेले आहेत. आता पहिला टप्प्यात आपली मतदार यादी आपले लोक हे चांगल्या पद्धतीने कसे ठराव करतील, हे पाहणे गरजेचे आहे. निवडणुकीचा टप्पा अद्यापही पुढे आहे.

Gokul Dudh Sangh : Satej Patil-Hasan Mushrif
Gokul election : 'गोकुळमध्ये उलटफेर! विनय कोरेंनी साथ सोडली; आता 'मुख्यमंत्र्यांचा शब्द' गोकुळचं राजकारण फिरवणार?' सावकारांनी नेमकी फॅक्ट सांगितली

सीपीआर रुग्णालयातील केबिन वादावर बोलताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने सीपीआर मधील विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. तोपर्यंत इथल्या अधिकाऱ्यांनी शांत रहावं, त्या केबिनमध्ये सिविल सर्जन बसत होते. हे खरं आहे पण ही मालमत्ता चल आणि आचल मालमत्ता असते. आता ही वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मालमत्ता आहे. मी आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर एकत्रित बसून या प्रश्नावर तोडगा काढू, असेही मुश्रीफ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com