Pandharpur Politics : विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांची परिचारकांच्या बालेकिल्ल्यात साखरपेरणी!

परिचारकांच्या गडात अभिजीत पाटलांनी सुरू केलेल्या दौऱ्याची पंढरपूर विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Abhijeet Patil
Abhijeet PatilSarkarnama

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने होळीच्या मुहूर्तावर पंढरपूर मतदारसंघात साखर पेरणीला सुरुवात केली आहे. आज त्यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत पंढरपूर शहरातील प्रभागनिहाय दौऱ्याची सुरुवात केली आहे. पंढरपूर शहर हा माजी आमदार प्रशांत परिचारकांचा बालेकिल्ला मानला जातो. परिचारकांच्या गडात अभिजीत पाटलांनी सुरू केलेल्या दौऱ्याची पंढरपूर विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Abhijeet Patil toured Pandharpur city ward wise)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर पाटील यांनी विधानसभा लक्ष्य ठेवले आहे. त्या दृष्टीने त्यांनी पंढरपूर (Pandharpur) विधानसभा मतदारसंघात साखर पेरणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने ही अभिजीत पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Abhijeet Patil
Ashok Chavan News : 'अशोक चव्हाणांना एवढी कशाची भीती वाटतेय...? त्यांची ED, CBIकडे तक्रार झालीय का?'

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम नुकताच संपला आहे. या हंगामामध्ये सात लाखांहून अधिक टन उसाचे गाळप केल्याने सभासद शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. निवडणुकीमध्ये सभासदांना दिलेल्या आश्वासनांपैकी बहुतांश आश्वासने पूर्ण केली आहेत. गाळप झालेल्या उसाचे बिल ही त्यांनी जवळपास दिले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी सध्या सभासदांमध्ये व व सामान्य जनतेमध्ये सहानुभूती आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.

Abhijeet Patil
Jadhav Vs Kadam : ‘एहेसान फरामोश’ भास्कर जाधवांनी त्यावेळी मला साष्टांग दंडवत घातला होता : रामदास कदमांचा पलटवार

विधानसभेच्या आखाड्यात पाटलांनी उडी घेतल्याने आगामी काळात चांगलीच धुळवड पाहायला मिळणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनीही सध्या बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांना आमदार अवताडे यांनी आपल्या गोटात खेचून घेतले आहे. राष्ट्रवादीचे इतर अनेक पदाधिकारीही आमदार अवताडे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता अभिजीत पाटील यांनीही पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Abhijeet Patil
Ramdas Kadam : 'कदमांना संपविण्यासाठी ‘मातोश्री’त शिजलेली कटकारस्थाने उदय सामंत १९ तारखेला उघड करणार'

पाटील यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत सलोख्याचे व मैत्रीचे संबंध आहेत. याचाही त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीने आपल्या पक्षात घेण्यासाठी पाटलांकडे सध्या प्रयत्न चालवले आहेत.

Abhijeet Patil
Thackeray Vs Kadam : उद्धव ठाकरेंनी ‘ते’ सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन : रामदास कदमांचे आव्हान

अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने विठ्ठल परिवारातील नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com