Abhijeet Patil : अभिजीत पाटलांचं ठरलं; माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार, पक्ष अद्यापही गुलदस्त्यात

Madha Assembly Constituency : महायुतीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे माढ्याचे आमदार आहेत. पण आगामी निवडणुकीत बबनदादा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे याबाबतची उत्सुकता असणार आहे.
Abhijeet Patil
Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 19 August : विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी चर्चेत असलेले पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी अखेर माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा त्यांनी थेट कुस्तीच्या मैदानातूनच केली आहे. निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली असली तरी कोणत्या पक्षाकडून लढवणार याबाबतचे पत्ते त्यांनी अद्याप ओपन केले नाहीत.

महायुतीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघ (Madha Assembly constituency) उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे (Babanrao Shinde) माढ्याचे आमदार आहेत. पण आगामी निवडणुकीत बबनदादा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे याबाबतची उत्सुकता असणार आहे. असे असले तरी माढ्यातून शिंदे विरुद्ध पाटील अशी लढत निश्चित मानली जात आहे.

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्या समर्थकांनी कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन केले होते. या कुस्ती स्पर्धेसाठी माढा विधानसभा मतदारसंघातून हजारो कुस्ती शौकिन आणि समर्थकांनी गर्दी केली. त्या सर्वांच्या साक्षीने अभिजीत पाटील यांनी माढ्यातून विधानसभेसाठ रणशिंग फुंकले आहे.

विधानसभेच्या आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठीच उतरत आहोत, असे स्पष्ट करून अभिजीत पाटील यांनी अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे टेन्शन वाढविले आहे. आता अभिजीत पाटील यांच्या विरोधात खुद्द बबनदादा उतरतात की मुलाला उतरवतात, हे पाहावे लागणार आहे.

Abhijeet Patil
Deepak Salunkhe : शहाजीबापूंचं आव्हान दीपक साळुंखे स्वीकारणार?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी अभिजीत पाटील यांची ओळख होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ते भाजपसोबत आहेत.

शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपपासून समान अंतर राखून सध्या अभिजीत पाटील आहेत. माढ्यातून कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार, हे अद्याप तरी त्यांनी जाहीर केलेले नाही. असे असले तरी माढा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Abhijeet Patil
Ajitdada Vs Ashok Pawar : तुमचा व्यंकटेश कृपा चालतो अन्‌ ‘घोडगंगा’च कसा बंद पडतो?; अजितदादांचा अशोक पवारांना सवाल

अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघातून गाठीभेटी सुरू केल्या आहेत. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे रविवारी कुस्तीचे मैदान भरवले होते. त्या कुस्तीच्या मैदानातून अभिजीत पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com