Ajitdada Vs Ashok Pawar : तुमचा व्यंकटेश कृपा चालतो अन्‌ ‘घोडगंगा’च कसा बंद पडतो?; अजितदादांचा अशोक पवारांना सवाल

Ghodganga sugar factory Issue : अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादाने बंद पडला, दादाने बंद पडला. कसा दादाने बंद पडला रे, तुमचा व्यंकटेश कृपा हा खासगी साखर कारखाना चालतो, तो बंद पडत नाही आणि घोडगंगा कसा बंद पडतो रे.
Ashok Pawar-Ajit Pawar
Ashok Pawar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 18 August : शिरूर तालुक्यातील बंद असलेल्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा आमदार अशोक पवार यांच्यावर हल्लाबोल केला. तुमचा व्यंकटेश कृपा हा खासगी साखर कारखाना बंद पडत नाही आणि घोडगंगा कारखानाच कसा बंद पडतो, असा खडा सवाल अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांना केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज आंबेगाव जुन्नरमध्ये होती. जुन्नरमधील सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोडगंगा साखर कारखाना बंद पडल्यावरून शिरूरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गाळप झालेल्या उसाला चांगला बाजारभाव देण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. तुमच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानेही चांगला भाव दिला आहे. बाकीच्या कारखानदारांनी काय भाव दिला आहे, असा सवाल करत अजित पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा तर भावच नाही, कारण तो कारखाना बंदच आहे.

Ashok Pawar-Ajit Pawar
Ajit Pawar : लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो,...लयं वंगाळ वाटतंय; अजितदादांनी व्यक्त केली खंत

अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादाने बंद पडला, दादाने बंद पडला. कसा दादाने बंद पडला रे, तुमचा व्यंकटेश कृपा हा खासगी साखर कारखाना चालतो, तो बंद पडत नाही आणि घोडगंगा कसा बंद पडतो रे. सांगा ना मला.

वाईटचं करायचं असतं तर व्यंकटेश कृपा हा कारखानाही बंद पडला असता. पण, मी तसला नाही. मी मदत करणारा कार्यकर्ता आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बारामती तालुक्यातील आमच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाने काल गाळप केलेल्या उसाला प्रतिटन तीन हजार पाचशे पन्नास रुपये बाजार भाव दिला आहे. आपलं काम बोलतं काम. शेवटच्या महिन्यात गाळप झालेल्या उसाला प्रति टनामागे दोनशे रुपये अधिकचे दिले आहेत. कारण शेवटी गाळप झालेल्या उसाला चांगली रिकव्हरी मिळते.

Ashok Pawar-Ajit Pawar
Samadhan Avtade : आमदारकीपेक्षा विधानसभा चालविण्याचा आनंद अविस्मरणीय होता; समाधान आवताडे

खोडवा आणि सुरू उसाला 3750 रुपये एवढा उच्चांक बाजारभाव दिला आहे. तो महाराष्ट्रातील नंबर एकचा भाव आहे. आपलं कामच एक नंबर आहे. पण, आता तुम्ही पाठीशी उभे राहावा, असे आवाहनही अजित पवार यांनी जनतेला केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com