MLA London Tour : राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; १२ आमदार निघाले लंडन दौऱ्यावर!

Maharashtra Politics : लंडन दौऱ्यावर जाणाऱ्या आमदारांमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, समाजवादी पार्टी या पक्षाबरोबरच अपक्षांचा समावेश असणार आहे.
All Parties MLA
All Parties MLASarkarnama

Mumbai News : राज्यातील सर्वपक्षीय १२ आमदार लवकरच लंडनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या १२ आमदारांचा हा पाच दिवसांचा अभ्यास दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते ब्रिटनमधील सुशासन आणि सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करणार आहेत. एकमेकांवर दररोज तोंडसुख घेणारे हे आमदार लवकरच ब्रिटनमध्ये एकत्र फिरताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना हे १२ आमदार लंडन दौऱ्यावर जात आहेत. (12 MLAs from all parties in the state will go on a London tour)

लंडन दौऱ्यावर जाणाऱ्या आमदारांमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, समाजवादी पार्टी या पक्षाबरोबच अपक्षांचा समावेश असणार आहे. हे आमदार लंडनमध्ये जाऊन सुशासनाचा अभ्यास करणार आहेत. दौऱ्यातील चांगल्या गोष्टींचा आपल्याकडील धोरणांमध्ये समाविष्ट करण्याची सूचना हे शिष्टमंडळ करत असते. त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात करायची, हे सरकारवर अवलंबून असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

All Parties MLA
Ram Shinde Advice to Son : ‘तू स्टेजवर (राजकारणात) यायची घाई करू नको’; व्यासपीठाकडे निघालेल्या मुलाला राम शिंदेंचा सल्ला

दरम्यान, या आमदारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे अमित साटम, मिहिर कोटेचा, जयकुमार रावल, मंगेश चव्हाण, पंकज भोयर, तर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अमीन पटेल, झिशान सिद्दिकी, अमित झनक, अस्लम शेख, तर समाजवादी पार्टीचे रईस शेख, अपक्ष सत्यजित तांबे यांचा समावेश आहे.

येत्या २० नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबरदरम्यान या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ब्रिटनमधील वर्ल्ड स्क्रीनिटी सेट डेव्हिड या विद्यापीठांमध्ये सुशासन आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी आमदारांचा हा लंडन अभ्यास दौरा असणार आहे.

All Parties MLA
Solapur Crime : दांडियाच्या कार्यक्रमाला बोलावून अभिनेत्रीशी केले असभ्य वर्तन; माजी नगरसेवक पुत्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

एकीकडे राज्यातील काही जिल्हे दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देत आहेत. राज्याची आर्थिक स्थिती तेवढीसी चांगली नाही. शेतकऱ्यांना जाहीर केलेले गेल्या वर्षीचे कांदा अनुदानातील काही रक्कम सरकारकडून अजूनही मिळालेली नाही. या वर्षीचा खरीप हंगामही बेताचाच झालेला आहे. अनेक विभाग आतापासूनच पाणीटंचाईला तोंड देत आहेत. त्यामुळे राज्य टंचाईच्या सीमारेषेवर उभे असताना अशी सरकारी उधळपट्टी कितपत योग्य, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होऊ शकतो.

All Parties MLA
Kolhapur News : तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com