Prakash Abitkar : विरोधकांना आरोपांचं कोलित मिळेना, प्रकाश आबिटकरांना गैबी घाटात घेरण्याचा डाव

Abitkar is being targeted after the action on Bidri factory : आबिटकरांचे जिल्ह्यातील वाढलेले राजकीय प्रस्त पाहता त्यांना राधानगरी पुरतेच मर्यादित ठेवण्याचं षडयंत्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यातील काही नेते मंडळींनी रचले आहे. बिद्री कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर आबिटकर यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
Prakash Abitkar
Prakash Abitkar Sarkarnama

Kolhapur Vidhansabha : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत घेण्याचा डाव जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधातील काही नेत्यांनी आखला आहे. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीनंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्यात सलग दोन वेळा राधानगरीत आमदारकी मिळवलेल्या आबिटकरांचे जिल्ह्यातील वाढलेले राजकीय प्रस्त पाहता त्यांना राधानगरी पुरतेच मर्यादित ठेवण्याचं षडयंत्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यातील काही नेते मंडळींनी रचले आहे. त्यात बिद्री कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर आबिटकर यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

एकेकाळी माजी आमदार के. पी. पाटील यांचे कार्यकर्ते असलेले आमदार प्रकाश आबिटकर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार के पी पाटील (K P Patil) यांचाच पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली. आजही त्यांच्या जिव्हारी हा पराभव लागला आहे. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा के. पी. पाटील यांचा पराभव करत विधानसभा सदस्य पद मिळवले आहे. 2014 ला 10 पैकी सहा आमदार शिवसेनेचे होते. तर 2019 च्या विधानसभेत दहा पैकी केवळ एकच आमदार शिवसेनेचा होता. तो म्हणजे आमदार प्रकाश आबिटकर.

Prakash Abitkar
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत फाईट; विधानसभेला उमेदवारीवरून नेत्यांची डोकेदुखी वाढणार

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यानंतर 2019 नंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारात केलेल्या विकास कामांमुळे जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली. मात्र, राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आबिटकर गेल्याने त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लावण्यात आला. तो शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या सहकार्यातून आमदार आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यात केलेल्या विकासकामाची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. पोलिस स्टेशन नूतनीकरण, ग्रामपंचायत नूतनीकरण, लघु प्रकल्प, लघुमध्यम प्रकल्प यासह अनेक विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आबिटकर यांनी केलेला आहे.

महाविकास आघाडीत शिवसेनेचे (Shivsena) आमदार असताना जिल्हाबँक, गोकुळ दूध संघात त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव करत बंधू प्रा. अर्जुन आबिटकर यांनी जिल्हा बँकेचे संचालक पद मिळवून दिले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय ताकद वाढत असताना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना राधानगरीतच रोखण्यासाठी हालचाली सुरू झाले आहेत. सध्या प्रकाश आबिटकर हे महायुतीत आहेत.

Prakash Abitkar
Vidhansabha Election News : कोल्हापुरात राजकीय वारसदारासाठी जुळवाजुळव तेजीत; जनता घराणेशाही स्वीकारणार का?

विधानसभा निवडणुकीत त्यांचा सामना माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासोबत आहे. मात्र आबिटकर यांच्या विरोधात प्रचारासाठी के. पी. पाटील यांच्याकडे ठाम मुद्दा नसताना त्यांनी बिद्री कारखान्यावरील कारवाईचा मुद्दा पुढे करत विधानसभेचा प्रचार सुरू केला आहे. गावोगावी वातावरण निर्मितीसाठी आपल्याच मर्जीतील सभासदांना विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालयासमोर मोर्चा आणि निदर्शन करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जाते. शिवाय बिद्री कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांनी देखील ही कारवाई चुकीचे असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे आमदार आबिटकर यांच्याकडे रोख दाखवला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार आबिटकर यांना राधानगरीच्या गैबी खिंडीतच गाठण्याचा डाव विरोधकांनी आखला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com