Kolhapur News, 20 Mar : शाहूवाडी (Shahuwadi) येथील तहसीलदारांच्या नावाने जमीन खरेदी संदर्भातील काम पूर्ण करून देण्यासाठी पाच लाखांची लाच घेणारा एसीबीच्या जाळ्यात रंगेहात सापडला आहे. तहसील कार्यालयातच वावर असणारा आरटीआयचा कार्यकर्ता सुरेश जगन्नाथ खोत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं आहे.
तहसीलदारांच्याच नावाने पाच लाखांची लाच मागितल्याने शासकीय विभागात खळबळ उडाली आहे. तर यामागे नेमकं कोण होतं? याची चर्चा देखील जोरात सुरू आहे. एसीबीकडून याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
शाहूवाडीतील मलकापूर बस स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. शाहुवाडी पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आले आहे.
पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व त्याच्या नातेवाइकांनी शाहुवाडी तालुक्यातील सावे येथे जमीन खरेदी केली आहे. मात्र या खरेदीमध्ये जमिनीच्या गट क्रमांकामध्ये फेरफार आणि खाडाखोड असल्याने त्याची नोंद चुकीच्या पद्धतीने झाली आहे.
फेरफारमध्ये खाडाखोड करणाऱ्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, तसेच सातबारा आणि फेरफार दुरुस्त करून मिळावा, यासाठी तक्रारदाराने शाहूवाडी तहसीलदारांकडे अर्ज केला होता.
त्याचा पाठपुरावा तक्रारदार करत होते. मागील दीड वर्षांपासून त्याचा पाठपुरावा सुरू होता. मात्र तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता. याच दरम्यान तक्रारदारांची खोत यांच्याशी ओळख झाली. रखडलेले काम मी पूर्ण करून देतो असे आश्वासन देत त्यांनी तहसीलदारांच्या नावाने पाच लाख रुपयांची लाच मागितली.
यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Department) तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने खातरजमा करून सापळा रचला आणि मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मागणीप्रमाणे प्रत्यक्ष पाच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोत याला पकडले.
तक्रारदारांनी सर्व बाबी तहसील प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र त्याचा दीड वर्षात विचार झालेला दिसत नाही. दरम्यान तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी या आरोपाचे खंडन करत आपला याच्याशी काही संबंध नाही.
असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून तक्रारदार पाठपुरावा करत असताना हे काम का झाले नाही? याचे उत्तर तहसील प्रशासनाकडे नाही. होत यांनी पाच लाखांची लाथ घेतल्यानंतर तहसीलदार चव्हाण यांच्या समोरील देखील अडचणी वाढले आहेत. मात्र चौकशी होईपर्यंत तहसीलदार चव्हाण यांच्यावर देखील कारवाईची सांगती तलवार राहणार आहे. अशी सर्वत्र चर्चा आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.